प्र. १. कारणे लिहा.
- लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण…..
उत्तर: लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण उन्हाळा असल्यामुळे आसपासची जमीन कोरडी शुष्क होती, काही झाड काळपट हिरवी आणि मलूल झाली होती परंतु; लिंबाचे ते झाड लसलशीत हिरवेगार आणि चैतन्यमय होते.
- पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण…..
उत्तर: पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण भोवतालच्या रखरखीत वातावरणात ते लिंबाचं झाड एक थंड असा आश्रय होता.
- लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण…..
उत्तर: लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण लिंबाच्या एका छोट्या फांदीवर मधमाश्यांचं पोळंही रचलं जाऊ लागलं होत.
प्र. २. चौकट पूर्ण करा.
पाठातील नाददर्शक शब्द –
उत्तर: कलकलाट व गजबजाट
प्र. ३. लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्ये कोणी कोणी प्राप्त करून दिली.
(१) संगीतमय झाड – चिमण्या व इतर पक्षी
(२) आश्रयदायी झाड – पक्षी, प्राणी, कीटक व माणसे
(३) आश्वासक झाड – बुलबुल आणि पोपट
(४) जीवनदायी झाड – सर्व सजीव
प्र. ४. ‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उत्तर: रस, दार, दास, सदा, सरदार
प्र. ५. पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंबे | ||
| मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
| परसदार | ||
| माणसे | ||
| स्त्रिया | ||
| पाणी जमीन | ||
| हिरवा आनंद | ||
जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंबे
परसदार –
कुटुंब क्र. १ = परसदारात हिरवेगार लिंबाचे झाड होते.
कुटुंब क्र. २ = परसदारात गवताची काडीही नव्हती.
माणसे –
कुटुंब क्र. १ = आनंदी, निर्मितीक्षम
कुटुंब क्र. २ = उदास, त्रस्त
स्त्रिया –
कुटुंब क्र. १ = आनंदी, हळव्या
कुटुंब क्र. २ = नेहमी दागिने घातलेल्या
पाणी जमीन –
कुटुंब क्र. १ = कमी प्रमाणात उपलब्ध पण योग्य वापर
कुटुंब क्र. २ = मुबलक होते
हिरवा आनंद –
कुटुंब क्र. १ = हिरवा आनंद नेहमी उपभोगला पसरवला व
कुटुंब क्र. २ = हिरवा आनंद कधी उपभोगला नाही व पसरवला नाही
प्र. ६. चूक की बरोबर ते लिहा.
१) परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती. = चूक
२) इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली. = चूक
३) लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती. = बरोबर
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत. = बरोबर
प्र. ७. स्वमत.
- वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर: प्रसिद्ध लेखक ‘भारत सासणे’ यांच्या ‘ते जीवनदायी झाड’ या पाठात फलदायी व जीवनदायी लिंबाचे झाड आणि मानवी जीवन यांची सुंदर सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केला आहे.
माणसांना जगण्यासाठी जो प्राणवायू लागतो तो झाडांमुळेच मिळतो. त्यामुळे जगण्यासाठी माणूस पूर्णपणे झाडांवर अवलंबून आहे. माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र व निवारा. ह्या गरजा झाडांमुळेच पूर्ण होतात. फूल आणि फळांनी भरलेले झाड पाहीले की मन प्रसन्न व टवटवीत राहते. याउलट जर झाडे नसतील तर माणसाला प्राणवायू मिळणार नाही व सृष्टी संमपुष्टात येईल.
- झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
उत्तर: प्रसिद्ध लेखक ‘भारत सासणे’ यांच्या ‘ते जीवनदायी झाड’ या पाठात फलदायी व जीवनदायी लिंबाचे झाड आणि मानवी जीवन यांची सुंदर सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केला आहे. माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र व निवारा. ह्या गरजा झाडांमुळेच पूर्ण होतात. सर्व सजीवांना जगण्यासाठी जो प्राणवायू लागतो तो झाडांमुळेच मिळतो. त्यामुळे जगण्यासाठी माणूस पूर्णपणे झाडांवर अवलंबून आहे. जमिनीतील कीटकांना सुद्धा झाडांच्या मुळांमुळे अन्न मिळते. अर्थात झाडाचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे ह्या सर्व गोष्टींचा सजीव उपभोग घेतात म्हणून झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र बनू शकते.
प्र. ८. अभिव्यक्ती.
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय – त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. हि घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.