अरण्याचा राजा = वनराज 

इतरांवर अवलंबून असणारा = परावलंबी

कथा लिहिणारा = कथाकार 

कधीही विसरता येणार नाही असे = अविस्मरणीय 

कर्तव्य तत्परतेने पार पाडणारा = कर्तव्यतत्पर 

कलेची आवड असणारा = कलावंत

कविता लिहिणारा = कवी 

कविता करणारी = कवयित्री 

कानाला गोड वाटणारा = कर्णमधुर

केलेले उपकार जाणणारा = कृतज्ञ 

केलेले उपकार विसरणारा = कृतघ्न 

खूप दानधर्म करणारा = दानवीर 

गुप्त बातम्या काढणारा = गुप्तहेर

चित्रे काढणारा = चित्रकार 

चुकीची शिस्त = बेशिस्त 

जमिनीवर राहणारे प्राणी = भूचर

जन्म झालेले ठिकाण = जन्मस्थान

ज्याला आई-वडील नाहीत असा = अनाथ

ज्याला मरण नाही असा = अमर 

ज्याला कोणीही शत्रू नाही असा = अजातशत्रू

जादूचे खेळ करून दाखवणारा = जादूगार

जाणून घेण्याची इच्छा = जिज्ञासा 

जिवंत असेपर्यंत = आजन्म  

जे ज्ञात (माहित) नाही ते = अज्ञात 

जेवढी शक्ती आहे तेवढी = यथाशक्ती 

दगडासारखे हृदय असणारा = पाषाण हृदयी 

दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा = मार्गदर्शक 

देशाची सेवा करणारा = देशसेवक 

देवापुढे सतत जळणारा दिवा = नंदादीप 

दररोज प्रसिद्ध होणारे = दैनिक

देवावर विश्वास ठेवणारा = आस्तिक 

देवावर विश्वास न ठेवणारा = नास्तिक 

धोक्याशिवाय = बिनधोक 

नियमित काळाने प्रसिद्ध होणारे = नियतकालिक 

पाच आरत्यांचा समूह = पंचारती 

पाण्यात राहणारे प्राणी = जलचर

पायात जोडे न घातलेला = अनवाणी 

पाहण्यासाठी जमलेले लोक = प्रेक्षक 

प्रत्येक गल्लीत = गल्लोगल्ली 

प्रत्येक घरी = घरोघरी 

प्रत्येक जागी = जागोजागी 

प्रत्येक दारी = दारोदारी 

प्रत्येक दिवशी = दिवसेंदिवस 

प्रश्न विचारताच उत्तर देणारा = हजरजबाबी

पश्चिमेकडील प्रदेशात राहणारे लोक = पाश्चिमात्य

भाषण करणारा = वक्ता 

 भाषण ऐकणारा = श्रोता 

मनास आकर्षून घेणारे = मनमोहक 

मरेपर्यंत = आमरण  

महिन्याने प्रसिद्ध होणारे = मासिक 

 लिहिता वाचता येणारे = साक्षर

लोकांचा आवडता = लोकप्रिय

 लोकांचे नेतृत्व करणारा = नेता

लंब आहे उदर ज्याचे तो = लंबोदर 

वनात राहणारे प्राणी = वनचर 

वर्षांनी प्रसिद्ध होणारे = वार्षिक

विक्री करणारा = विक्रेता 

विमान चालवणारा = वैमानिक

विधीप्रमाणे = विधीवत 

शत्रू कडील बातमी काढणारा = हेर 

शोध लावणारा = संशोधक

सतत उद्योग करीत राहणारा = उद्योगी  

सतत भांडण करणारा = भांडखोर 

सत्याचा आग्रह धरणारा = सत्याग्रही 

सर्व काही जाणणारा = सर्वज्ञ

स्वतःचे काम स्वतः करणारा = स्वावलंबी 

स्वतः श्रम न करता खाणारा = ऐतखाऊ

सुखाने आयुष्य जगू पाहणारा = सुखासीन 

सूर्याचा उदय = सूर्योदय 

सांगितलेलं तेवढेच काम करणारा = सांगकाम्या 

हमखास लागू पडणारे औषध = रामबाण औषध 

होडी चालवणारा = नावाडी

ज्ञानरूपी अमृत = ज्ञानामृत