मुद्दे – छंद म्हणजे काय?- छंदाचे प्रकार – आवडता छंद – आवडण्याचे कारण – छंद जपण्यासाठी प्रयत्न – फायदे
जे केल्याने आपल्या मनाला आनंद होतो. मन प्रसन्न, प्रफुल्लित होते. त्याला छंद म्हणतात. गाणे ऐकणे – गाणे, त्याच्या कॅस्सेट्स जमा करणे, चित्रपट नाटक पाहणे, वाचणे, नाणी किंवा स्टॅम्प्स गोळा करणे, प्रसिद्ध व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या जमा करणे, फिरणे, बागकाम करणे, पक्षी-प्राणी पाळणे असे अनेक वेगवगळे छंद लोकांना असतात.
माझा आवडता छंद पुस्तक वाचणे आहे. अनेक पुस्तके मी वाचली आहेत व त्यातल्या आवडत्या गोष्टी माझ्या वहीत टिपून ठेवल्या आहेत. माझे सर्व मित्र त्यांच्याजवळची पुस्तके मला वाचण्यासाठी देतात. मी वाचनालयात सुद्धा जाते. माझ्या दर वाढदिवसाच्या दिवशी मी पुस्तके घेतो. पुस्तके वाचल्यामुळे ज्ञानात भर तर पडतेच, मन ताजतवानं राहतं, अनेक नवीन गोष्टी आत्मसात करता येतात.