“Fly High” याची प्रचिती मला मी पक्षी झाल्यावरच होईल….. मी पक्षी झाल्यावर मला उंच आकाशात भरारी घेता येईल. पक्षी बनून उंच आकाशात भरारी घेणं फार मजेशीर असेल. कोणीही अडवणार तिथे नसेल. या झाडावरून त्या झाडावर..
या जागेवरून त्या जागेवर स्वच्छंदपणे उडता येईल. खाण्याची सुद्धा कमी नसेल. हवं त्यावेळी, हवं तेवढ खाता येईल. अनेक फळं, फुले यांचा रस चाखायला मिळेल. नवीन प्रदेश पाहता येतील. तेही आकाशातून. शाळा जावे लागणार नाही आणि मग अभ्यास तर करायची गरजच लागणार नाही. झाडांच्या सावलीत एका पानाखाली किंवा घरट्यात बसून छान आराम करत राहील.
मला नवनवीन देश बघण्याची किती आवड आहे. त्या सगळ्या देशांमध्ये मी जाऊन येईन आणि त्यासाठी मला तिकीट किंवा विझा सुद्धा काढायची गरज भासणार नाही. कुठलेही सामान नाही पैसे नाही कशाचीच गरज नाही. फक्त माझे पंख मला सगळीकडे फिरवून आणतील कुठल्याही परवान्याशिवाय.
अरे! पण मी संवाद कोणाशी साधू?? माझे मित्र-मैत्रिणी, आई-वडील, भाऊ-बहीण हे सगळे नसतील. मग मी पाहिलेला सगळ्या गोष्टी मी कोणाला सांगू? मला बोलायला, गप्पा मारायला, कोणीही मिळणार नाही. माझे सोबती नसतील तिथे माझी चिवचिव ऐकायला.