एक राजा – आळशी प्रजा – राजाची उपाययोजना – रस्त्याच्या मधोमध दगड ठेवण्याची आज्ञा देणे – लोकांनी दगड पाहणे व कडेने जाणे – जबाबदार नागरिकाने दगड बाजूला करणे – धनाची पेटी सापडणे – राजकडे नेऊन देणे – राजा आनंदी – प्रजेसमोर योग्य नागरिकाचा सत्कार – प्रजेस बोध होणे.  

“विशाल” हा विशालनगरचा राजा होता. तो अत्यंत हुशार, सुंदर, गुणी व चाणाक्ष राजा होता. तो त्याच्या प्रजेसाठी अनेक योजना आखत, सोयीसवलती देत. शेतीसाठी, व्यापारासाठी राजाने अनेक उपक्रम राबवले.

पण विशालनगरातले लोक मात्र आळशी होते. फार कमी लोक त्या योजनांचा लाभ घेत असे. त्यामुळे राजाला खूप वाईट वाटत असे. या आळशी लोकांचे काहीतरी केले पाहिजे, म्हणून त्याने एक शक्कल लढवली. रस्त्याच्या मधोमध दगड ठेवण्याची आज्ञा एका सेवकला त्याने दिली. लोक दगड पाहत व कडेने निघून जात.

परंतु; हरी नावाच्या एका माणसाला मात्र रस्त्याचा मधोमध असलेला दगड खटकला. त्या दगडांमुळे सर्वांनाच त्रास होत होता. त्याने तो दगड बाजूला सरकवला.

            आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण, त्या दगडाच्या खाली एक धनाची पेटी होती. हरीने ती राजाकडे सुपूर्द केली. राजाला खूप आनंद झाला. त्याने सर्व प्रजेसमोर हरीचा सत्कार केला. तेव्हा प्रजेला बोध झाला की आपण नागरिकाचे कर्तव्य पार पाडले तर त्यात आपलाच फायदा होणार आहे.