साने गुरुजी विद्यालय – वार्षिक क्रीडा महोत्सव (SSC २०२०)
मुद्दे : साने गुरुजी विद्यालय, सोलापूर, भव्य वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न दि. १३ जानेवारी वेळ: सकाळी ८ वाजता, प्रमुख पाहुणे : मा. सौ. अपर्णा भोसले, अध्यक्ष : मा. श्री. रोहित बर्वे, इ. ५वी ते ९वीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग, कवायतीचे प्रकार क्रीडा साहित्यावर आधारित नृत्य प्रकार मल्लखांबाचे प्रकार लेझीम नृत्य बक्षीस समारंभ.
बातमी
सांगली : १३ जानेवारी, साने गुरुजी विद्यालय सोलापूर येथे भव्य वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मल्लखांब खेळाडू मा. सौ. अपर्णा भोसले या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. श्री. रोहीत बर्वे यांनी भूषवलं. त्यांच्यासोबत अनेक सन्माननीय पाहुणे उपस्थित होते जसे, आमदार प्रदीप मुले, श्री. श्रीकांत कारंडे. सौ. अपर्णा भोसले यांनी उद्घटनाच्या भाषणात मल्लखांबाची तयारी त्यांनी कशी केली तसेच हा खेळ निवडल्यावर त्यांना काय काय आव्हाने आली ह सांगितले. विशेषतः महिला खेळाडू कसे आपले करिअर घडवू शकतात हे मुद्देसूदपणे सांगितले. त्यानंतर अध्यक्षीय भाषण झाले. सर्व ५वी च्या व ९वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. उदघाटनाच्या भाषणानंतर मैदान हे भव्य रंगमंच बनले आणि विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कवायती करून दाखवल्या. अतिशय लयबद्ध रीतीने लेझीम नृत्य मुलांनी सादर केले. चेंडू रिंग्स आणि रिबिन्स घेऊन एक सुंदर नृत्य लयबद्ध संगीतावर खेळाडूंनी सादर केले. ते पाहून उपस्थित सर्वच आश्चर्यचकित झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर बक्षीस समारंभ पार पडला. प्रत्येक खेळात क्रमांक पटकवलेल्या मुलांचा कौतुक करण्यात आले. धावण्याची शर्यत, उंच उडी, लांब उडी, रिले शर्यत, थाळी फेक, भाला फेक यांसारख्या स्पर्धा झाल्या होत्या. फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट यांच्याही स्पर्धा झाल्या होत्या. या महोत्सवातून क्रीडा विश्वाला अनेक भावी खेळाडू मिळतील.