जागतिक वृद्ध दिन (SSC २०१९)
१ ऑक्टोबर, निर्मलनगर पुणे आधारवड वृद्धनिवास येथे “जागतिक वृद्ध दिन” जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व वृद्ध मंडळींना मोफत प्रवेश होता. अनेक वृद्ध स्त्री-पुरुषांनी या संधीचा फायदा उचलून आपले कलागुण सादर केले. पण कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते ‘श्रीराम लागू’ यांचा हस्ते झाले. वृद्ध निवासात “वृद्धापकाळ” या विषयावरचे ज्येष्ठ नागरिकांचे चित्रप्रदर्शन देखील भरवण्यात आले होते. ज्याला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
“वृद्धनिवासचे” संस्थापक ‘श्रीनिवास काळे’ यांनी आपल्या भाषणात असे म्हटले की, वृद्धांनी आपल्या जीवनात कुणावरही अवलंबून न राहता दिलखुलासपणे जगले पाहिजे. वृद्धनिवास सारख्या अनेक संस्था वृद्धांच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत. आत्तापर्यंत कुटुंबाचा विचार करून जीवन जगत आलो पण, आता या आयुष्याच्या पाडावावर आपले मागे पडलेले कला, छंद, आवडी जोपासून मजेत घालवले पाहिजे. त्यांनी सादरकर्ते रसिक मित्रमंडळ, पुणे यांचे उत्तम आयोजनासाठी आभार मानले. वृद्धांनी आपापली मते भाषणात मांडली. एक छोटसे नाटकही सादर करण्यात आले. सर्व सहभागी झालेल्या वृद्धांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम देखील पार पडला. ज्याचा मनमुराद आस्वाद प्रेक्षकांनी घेतला. या कार्यक्रमाचे सदारकर्ते होते रसिक मित्रमंडळ, पुणे.