कथालेखन (SSC 2018)
मुद्दे – सीमा हुशार मुलगी – हलाखीची परिस्थिती – कष्ट करून शिक्षण – शाळेत सुंदर हातांची स्पर्धा वर्गातील सर्वांचा स्पर्धेत सहभाग –सर्वांचे सजलेले हात – सीमा निराश – परीक्षकांचा निकाल – कष्ट करणारे हात सुंदर – सीमा विजयी
सुंदर हात
सीमा नावाची एक हुशार मुलगी जीवन विद्यालयात शिकत होती. तिच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. तिचे बाबा रिक्षा चालवत. घर चालवण्यासाठी आणि मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सीमाची आई सुद्धा चार घरी काम करत असे. त्यामुळे सीमा घरचे सर्व काम आवरून आपली शाळा, अभ्यास करत असे. आई-बाबा कामाला गेल्यावर घरातील राहीलेली कामे आवरून छोट्या भावाला तयार करुन त्याच्यासोबत ती शाळेत येत असे. तिचा भावाचा अभ्यासही ती घेत असे.
शाळेत एके दिवशी सुंदर हातांची स्पर्धा होती. सर्वांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेच्या दिवशी सर्वांचे हात मेहेंदीने, सुवासिक क्रीम्सने छान सुंदर दिसत होते. पण सीमांचे हात काम करून रखरखीत झालेले होते. सीमा खूप निराश झाली. परीक्षकांचा निकाल ऐकून सर्वांना धक्काच बसला. कारण सीमाला प्रथम क्रमांक मिळाला होता. काबाड कष्ट करणारे हात नेहेमीच सुंदर असतात याची प्रचिती सर्वांना आली.