कथालेखन – वरद ची खिलाडूवृत्ती (SSC 2020)

आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक वरदचा पाय मुरगळणे – स्पर्धा  सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हार्यही वरदचे कौतुक

वरद ची खिलाडूवृत्ती

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंतरशालेय क्रीडा स्पर्धा २६ जानेवारी रोजी दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात भरल्या होत्या. सर्वच शाळा त्यात सहभागी झाल्या होत्या. मुलांची आणि मुलींची धावण्याची ४०० मी. ची अंतिम फेरी आज होती . ज्ञानसाधना विद्यालयाचा वरद मोहिते अंतिम फेरीत होता. वरद एक उत्तम धावपटू होता. २०० मी. धावण्याच्या स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक पटकावला होता. त्याने खूप श्रम घेतले होते. २ महिने तो स्पर्धेची तयारी करत होता. सकाळी ५ वाजता उठून तो १५-२० कि.मी. धावत असे. त्याच्या प्रशिक्षकांचे सुद्धा त्याला मार्गदर्शन मिळत होते. २०० मी. स्पर्धेत बक्षीस मिळवल्यामुळे वरदचा आत्मविश्वास वाढला होता. त्याचे लक्ष पहिल्या क्रमांकाचे पदक होते.

या ४०० मी. स्पर्धेत तनय कुलकर्णी हा श्रीराम विद्यालय मधील विद्यार्थी वरदला जोरदार टक्कर देणार होता. कारण तोसुद्धा या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा दावेदार होता. गेल्यावर्षीच्या ४०० मी. धावण्याच्या  स्पर्धेत तनय पहिल्या क्रमांकावर होता. पण यावर्षी वरदची कामगिरी पाहून तो थक्क झाला होता. वरद आपल्याला चुरशीची टक्कर देणार हे त्याने ताडलं होता. तो देखील हार मानणाऱ्यातला नव्हता. त्याने मनात दृढ निश्चय केला. ही स्पर्धा मीच जिंकणार.

स्पर्धेची वेळ झाली. ७ स्पर्धक अंतिम फेरीत धावणार होते. ते सर्व एका रेषेत उभे राहिले. शिट्टी वाजली आणि ७ ही स्पर्धक जीव तोडून धावू लागले. सर्वात पुढे वरद होता आणि त्यामागे तनय. वरदला पुढे पाहून तनय अजून बळ लावून चपळाईने त्याच्या सोबत धावू लागला. हळूहळू तनयची सरशी होऊ लागली. पण इतक्यातच तो खाली पडला आणि वेदनेने कळवळु लागला. त्याचा पाय मुरगळला होता. स्पर्धा विसरून वरद त्याच्या मदतीला धावला. धावपट्टी बाहेर त्याला घेऊन आला. दोघेही एकमेकांचे स्पर्धक होते. पण वरदने त्याच्या स्पर्धकासाठी स्पर्धा सोडली याचेच सर्व कौतुक करू लागले. वरदने सर्वांची मने जिंकली होती.