वाई माध्यमिक विद्यालयात बालदिनाचा जल्लोष (SSC 2025)

वाई, १४ नोव्हे. – माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्याक श्री. कौस्तुभ पाटील यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात बालदिन का साजरा होतो हे सांगितले. बालदिन म्हणजे १४ नोव्हेंबर हा पंडित नेहरू चा जन्म दिवस. त्यांना मुले खूप आवडत व मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत. त्यांच्या स्मरणार्थ आपण बालदिन साजरा करतो. मुले हीच मोठी होऊन देशाचे सुजाण नागरिक बनतात. मुले शिकली त्यांना त्यांच्या जाबदाऱ्या समजल्या की देश एक प्रगत देश नक्कीच बनू शकतो. त्यामुळे मुलांनी शिकले पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे  त्यासाठी असे कार्यक्रम आयोजित होत राहिले पाहिजेत, असे ते म्हणाले.

            बालदिन म्हणजे बालपण जपण्याच्या दिन. प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांनी मिळून अनेक कार्यक्रम आठवडाभर पार पाडले. त्यात निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, वाचन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा होत्या. या सर्व स्पर्धांच्या बक्षीस वितरण आज होते. या सर्व स्पर्धांमध्ये यश मिळालेल्या स्पर्धकांना मुख्यध्यापकांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. मुलांनी एक छोटीशी नाटुकली सादर केली जी खूपच अप्रतिम होती. बहारदार नृत्य सादरीकरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.