“उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं,” विनू म्हणाला.

केयूर सांगू लागला “अरे चैतन्य ती निसर्गवेध संस्था आहे ना, त्यांच्या सागरदर्शनला माझा दादा गेला होता. त्याला खूप आवडलं त्यांचं आयोजन. ते मर्यादित बुकिंग्सच घेतात म्हणजे गर्दी नाही होत.

विनूने विचारले, “ तिथे काही नोंदणी फी किंवा वेळ मर्यादा आहे का?”

त्यावर केयूर म्हणाला, “२००० रुपयांमध्ये सकाळी ९ वाजता पहिला कार्यक्रम सुरू होतो. तिथल्या स्थानिक कोळी लोकांची पारंपरिक मासेमारी दाखवण्याचा असतो. त्यात ते केळशी सागर किनारा दाखवतात.

जेवणाचं काय? चैतन्य मध्येच म्हंटला.

त्यांच्या रिसॉर्टमध्ये दोन वेळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण असते, दादाने आणि त्याच्या मित्रांनी तिथे खूप मज्जा केली.” केयूरने सांगितले.

निमा म्हणाली,”आपण पण जाऊया का तिथे? चला लगेच बुकिंग करून टाकू.”