कथेचे शीर्षक: “खोटेपणाचं फळ” (CBSE 2024)
शेतकऱ्याचा मुलगा – खोटे बोलण्याची सवय – आईवडील शेतावर – मुलगा सांगतो चोर आला – फसवतो – एकदा खरेच चोर येतो – मुलगा चोर आल्याचे सांगतो – खोटे समजून दुर्लक्ष करतात – घरात खरेच चोरी – मुलाला चोप
एका गावात राघव नावाचा शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याचा छोटा मुलगा सोहम फारच खोडकर होता. सोहमच्या खोड्यांनी अख्ख गाव वैतागले होते. त्याला खोटं बोलण्याची वाईट सवय होती.
रोज सकाळी राघव आणि त्याची बायको शेतात कामाला जात असत, आणि सोहम घरी एकटाच असे. वेळ घालवण्यासाठी तो नवीन काहीतरी खोडी शोधायचा. एके दिवशी त्याने आरडाओरडा केला, “आई! बाबा! चोर आला! लवकर या!”
आईवडील धावत आले, पण घरात कुठेच चोर नव्हता. तेव्हा तो मोठ्याने हसू लागला, “हाहा! फसवलं ना!” अशा प्रकारे त्याने दोन-तीन वेळा खोटं सांगून आई-वडीलांची थट्टा केली. हे करून त्याला खूपच मज्जा आली.
एक दिवस खरंच काही चोर त्यांच्या घरात घुसले. सोहमने घाबरून जोरजोरात ओरडायला सुरुवात केली, “आई! बाबा! चोर आला, खरंच आला!” हा पुन्हा फसवतोय असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले.
चोरांनी घरातली बरीच महागड्या वस्तू, पैसे चोरले आणि पसार झाले. शेवटी जेव्हा आईवडील परत आले, तेव्हा घरातील पसारा पाहून त्यांना धक्का बसला. सोहमने सर्व सांगितले, आणि त्याला आपली चूक उमगली. आईवडीलांनी रागाने त्याला चोप दिला, पण नंतर त्याला समजावलं की खोटं बोलणं किती धोकादायक असतं.
त्या दिवसानंतर सोहमने खोटं बोलणं कायमचं सोडलं.
तात्पर्य:
विश्वास मिळवायला वेळ लागतो, पण गमवायला क्षण पुरतो