शब्द – घर, श्रीमंती, मैत्री, मदत.

साहस मैत्रीचे

नवापूर गावात एक छोटेसे टुमदार घर होते. त्यात संसारे नावाचे कुटुंब आनंदाने राहत होते.  हे कुटुंब गावात आपल्या चांगुलपणाबद्दल खूप नावाजलेलं होत. दगडू संसारे हे नेहमी सर्वांना मदत करत. त्यांचा मुलगा धनंजय व त्याचा मित्र सुहास यांच्यातील मैत्री सर्वांनाच माहिती होती.

सुहास याच्या बाबांची अडचण समजून त्याच्या शाळेचा सर्व खर्च धनंजयच्या बाबांनी उचलला. धनंजय आणि सुहास दोघेही खूप शिकले आणि त्यांनी गावाचं नाव मोठं केले.

ते दोघे शहरातून शिकूनह आले आणि त्यांनी गावात येऊन गावचा विकास करायचे ठरवले. नवापूर हे एक साक्षर, विकसित, प्रगतिशील गाव बनेल यासाठी त्यांनी अनेक उपक्रम गावात सुरु केले. त्यामुळे गावचा विकास झाला. त्यांनी गावाला इतके प्रगतशील बनवले की गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.