कथालेखन (MM २०२३)

पाडळी गावातील सखू आपल्या रानात भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या भाज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्यारस्त्यात जाईपर्यंत काळोख दाटून आला. एक हुरहुर तिच्या मनात दाटून आली, पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला.

ती थबकली आणि एक आजोबा सायकल घेऊन उभे होते. बहुतेक ते वाट चुकले होते. सखू एकदम दचकली. तिला काय करावे कळेना. ती आजोबांकडे बघत राहिली. सशक्त बांधा पण केस पूर्ण पांढरे ते आजोबा अचानक सखूच्या समोर आले. मुली मला रामपूरला सोडशील का? मला या अंधारात नीट दिसत नाही.

रामपूर गावीच तर चालली होती सखू ते तिचंच गाव होतं. काळेकुट्ट आजोबा अंधारात दिसतच नव्हते, दिसत होता तो त्यांचा पांढरा वेष, पांढरे धोतर, पांढरा शर्ट आणि डोक्यावर गुलाबी फेटा. सखू बावरली होती. अंधार होता. पाडळी वरून रामपूरला जाणारी वाट तिची रोजचीच होती. तिला ती तोंडपाठ होती पण अंधारात तिला भीती वाटत होती. आणि देवाचे नाव घेत चालली असताना हे म्हातारे आजोबा सामोरे आले. आणि त्यांनाही पाडळीलाच जायचे होते. तिला मनात हायस वाटलं, आपण एकटे नाही. आजोबांना घेऊन रस्ता पटकन संपेल. तेही पाडळीला पोहोचतील आणि मीही.

सखूचे सामान सायकल वर टाकून दोघे चालत गप्पा मारत निघाले. रस्ता संपला सखूच घर आलं. सखू आजोबांना घेऊन घरी आली. त्यांच्यासाठी पाणी आणायला आत आली. पाणी घेऊन बाहेर आल्यावर आजोबा तिथे नव्हतेच. फक्त आजोबांची सायकल होती. सखूने विचार केला देव स्वतःच माझ्या मदतीला धावून आला. तिने हात जोडले व देवाचे स्मरण केले.