कथेचे शीर्षक : शहाणे गाढव (CBSE 2024)
एका माणसाकडे गाढव – नदी पार करुन ओझे नेणे – मिठाची पोती – गाढव पाण्यात बसते – मीठ विरघळते – ओझे कमी – गाढवाची लबाडी – दुसऱ्या दिवशी कापसाची पोती – पाण्यात बसते – पोती जड – गाढवाला पश्चाताप
एका गावात रामू नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक गाढव होते. दररोज सकाळी रामू आपल्या गाढवावर ओझी लादून नदी पार करून बाजारात जायचा. एकदा त्याने गाढवावर मिठाची पोती लादली आणि नदी पार करत असताना गाढव चुकून पाण्यात बसले. गाढव उठल्यावर त्याला जाणवले की ओझे खूपच हलके झाले आहे. खरंतर पाण्यात बसल्यामुळे मीठ विरघळलं होतं! गाढवाला ही युक्ती फारच आवडली. त्याने ठरवलं की रोजच पाण्यात बसायचं म्हणजे ओझं कमी होईल.
दुसऱ्या दिवशी रामूने गाढवावर कापसाची पोती लादली. गाढवाला वाटलं, “आजही पाण्यात बसूया!” आणि ते पाण्यात बसले. पण यावेळी उलटं घडलं – कापूस पाण्यामुळे ओला होऊन जास्तच जड झाला ! ओझं इतक जड झाले की त्याला हलताच येईना. त्याला फार त्रास झाला.
रामूने हे पाहिलं आणि गाढवाला रागावून सांगितलं, “शहाणपणाचा बनाव करत होतास, आता कळलं का परिणाम?”
गाढवाला आपल्या लबाडीचा पश्चाताप झाला आणि त्याने पुन्हा कधीही अशी चूक न करण्याचा निश्चय केला.