प्र. १. (अ) कारणे लिहा.
अ कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण
उत्तर: वसंत ऋतूच्या स्वागतासाठी दाही दिशांना रंग उधळले.
आ जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण
उत्तर: पळसफुले मातीच्या अंकावरती फुलून आली म्हणून जगातील सर्व फुले मनात झुरू लागली.
आ खालील आकृतिबंध पूर्ण करा.
वसंतऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक
उत्तर: सृष्टी, लिंबोणी, नागफणी, वड, पिंपळ, घाणेरी, पळसफुले, आंबा, सांबर, उजाड माळरान
इ पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.
उत्तर:
वसंतऋतू आगमनापूर्वी – बेरड व कोरडी सृष्टी
वसंतऋतू आगमनानंतर – वसंत गाणे गाणारी सृष्टी
प्र. २. सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
घटक त्यांचे सजणे
- लिंबोणी गर्द पोपटी रंगाची वस्त्रे घालून सजली आहे.
- नागफणी गर्द तांबडी कर्णफुले घालून सजली आहे.
- घाणेरी दोन रंगांची ओढणी घेतली आहे.
- पळसफुले मातीच्या गालीच्यावर बहरली आहेत.
प्र. ३. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
१ भेटवस्तू – नजराणा
२ सजली – नटुनी थटुनी
३ अरुंद रस्ता – पाणंदी
४ अंक – चिन्ह
प्र. ४. भावार्थाधारित.
१ ‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
उत्तर: प्रसिद्ध कवयित्री ‘ललिता गादगे’ लिखित ‘उजाड उघडे माळरान’ ह्या कवितेतील वरील ओळी आहेत. प्रस्तुत कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे. कवयित्रीच्या मते शेतातून जाणाऱ्या अरुंद वाटेवर लाल कळ्यांनी सांबर वृक्ष बहरले आहे आणि वसंत ऋतूच्या स्वागताला सज्ज झाले आहे.
२ ‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हाला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर: प्रस्तुत ओळी ह्या प्रसिद्ध कवयित्री ‘ललिता गादगे’ लिखित ‘उजाड उघडे माळरान’ ह्या कवितेतील आहेत. प्रस्तुत कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे. कवयित्रीच्या मते वसंतऋतूच्या आगमनामुळे संपूर्ण सृष्टी आनंदमय झाली आहे. संपूर्ण सृष्टी विविध रंगांच्या पानाफुलांनी बहरून गेली आहे. आंब्याच्या झाडांना मोहोर आला आहे. तसेच इतके दिवस उजाड असलेले माळरानही वसंतऋतूच्या आगमनाचे गाणे गाऊ लागले आहे.
प्र.५. अभिव्यक्ती
अ वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
उत्तर: वसंतऋतूच्या आगमनाने सर्वत्र आनंदी वातावरण होते. आंब्याच्या झाडांना मोहोर आल्यामुळे सर्वत्र त्याचा सुगंध दरवळत असतो. झाडे हिरव्या पानांनी व विविध फुलांनी बहरून आलेली असतात. सगळीकडे ताजेतवाने वातावरण असल्यामुळे सर्व लोक प्रसन्न असतात.
आ सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा.
उत्तर: वसंत ऋतूत जसे वातावरण प्रसन्न आणि ताजेतवाने असते तसे ते कायम राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान एकतरी झाड लावले पाहिजे. घरे बांधण्यासाठी जी वृक्षतोड केली जाते ती थांबवली पाहिजे. जंगलतोड कमी झाली पाहिजे. पाण्याचा स्रोत जपला पाहिजे. प्रदूषण कमी करुन वृक्षांचे संगोपन केले पाहिजे. वृक्षतोड करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे जेणेकरून इतर कोणी वृक्षतोड करणार नाही.