(अ) भेटीलागे जीवा
प्र. १. कोष्टक पूर्ण करा.
| अ. क्र. | वाट बघणारा | कोणाची वाट बघतो | वाट बघण्याचे कारण |
| (१) | चकोर | पूर्णिमेचा चंद्रमा | चंद्रकिरण हेच त्याचे जीवन |
| (२) | लेंकी | माहेरचे बोलावणे येणे | दिवाळीचा सण |
| (३) | भुकेलेले बाळ | माऊलीची | भूक |
| (४) | संत तुकाराम | पांडुरंगाची | भेटीची आस |
प्र. २. योग्य अर्थ शोधा.
(अ) आस लागणे म्हणजे – ध्यास लागणे
(१) ध्यास लागणे (२) उत्कंठा वाढणे (३) घाई होणे (४) तहान लागणे
(आ) वाटुली म्हणजे – वाट
(१) धाटुली (२) वाट (३) वळण (४) वाट पहाणे
प्र. ३. भावार्थाधारित.
- संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा.
उत्तर : ‘भेटीलागी जीवा’ या ‘संत तुकाराम’ यांच्या अभंगात त्यांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टान्तातून व्यक्त केली आहे.
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर असलेल्या आपल्या मन:स्थितीचे वर्णन करताना दिलेले लहान बाळाचे उदाहरण अतिशय समर्पक आहे. ज्याप्रमाणे लहान बाळासाठी त्याचे विश्व हे त्याची आईच असते, त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व फक्त विठ्ठलच आहे. बाळाला भूक लागल्यावर ते अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहते. तिच्या भेटीसाठी आतुर झालेले असते, त्याप्रमाणे संत तुकाराम विठ्ठलाची भेटीसाठी आतुरलेले आहेत. परिणामी हा दृष्टान्त अतिशय समर्पक वाटतो.
- चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात,ते तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर : ‘भेटीलागी जीवा’ या ‘संत तुकाराम’ यांच्या अभंगात त्यांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टान्तातून व्यक्त केली आहे.
संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, पौर्णिमेच्या चंद्राची तो आतुरतेने वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे पंढरपुरच्या विठ्ठलाच्या भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे. विठ्ठलाचे दर्शन हेच जणू त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.
- ‘तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणीच्या भेटीला आसुसले आहात’ हे सांगण्यासाठी एखादा दृष्टांत वापरा व तो स्पष्ट करा.
उत्तर: