1.  दुसऱ्याची परिस्थिती आपल्या वाट्याला आली की तिचे खरे ज्ञान होते.
  2.  सगळ्या गोष्टी हातातून निघून गेल्यावर जे उरते त्याला अनुभव म्हणतात.
  3.  जो सर्वांना आवडतो, तो देवाला ही आवडतो .
  4. पुस्तकासारखा  बोलका मित्र कोणी नाही.
  5.  अतिपरिचयामुळे अपमानाचे प्रसंग उद्भवतात .
  6. फुटलेले मोती आणि तुटलेले मन सांधता येत नाही.
  7.  वादळे होतात म्हणून सागर कधी आटत नाही.
  8.  स्वप्न आणि सत्य यातील प्रवासाला जीवन असे म्हटले जाते.
  9.  दुसऱ्या पेक्षा अधिक सुखी होण्याची इच्छा बाळगली नाही तर प्रत्येक माणूस सुखी होऊ शकेल.
  10.  उत्कर्षाचे दिवस आले की विनयाने वागा. 
  11. लेखणी ही जन्मजात देणगी असून ती अभ्यासाने व चिंतनाने कमवावी लागते.
  12.  पैसा ही खरी लक्ष्मी नसून शांती हीच खरी लक्ष्मी आहे.
  13.  कृती शब्दापेक्षा मोठ्याने बोलत असते.
  14.  चंचल मन हे दुःखाचे सागर तर निर्मळ मन हे सुखाचा सागर आहे.
  15.  निंदा आणि स्तुती झोक्याप्रमाणे असते, त्याने माणसाची प्रगती होत नसते.
  16.  दयाळूपणा हा अंतःकरणाचा धर्म आहे ,हाताचा नव्हे.
  17.  प्रेम व सद्गुण हेच मानवाचे खरे  वैभव.
  18.  शिक्षणाची मुळे कडु असली, तरी त्याची फळे मधुर असतात.
  19.  घोर अत्याचार व अपमान मनुष्याला निराशावादी बनवतात.
  20.  कर्तव्याच्या वेदीवर  स्वेच्छेने आत्मसमर्पण करणे, हेच जीवनाचे सौंदर्य आहे.