Skip to content
- दुसऱ्याची परिस्थिती आपल्या वाट्याला आली की तिचे खरे ज्ञान होते.
- सगळ्या गोष्टी हातातून निघून गेल्यावर जे उरते त्याला अनुभव म्हणतात.
- जो सर्वांना आवडतो, तो देवाला ही आवडतो .
- पुस्तकासारखा बोलका मित्र कोणी नाही.
- अतिपरिचयामुळे अपमानाचे प्रसंग उद्भवतात .
- फुटलेले मोती आणि तुटलेले मन सांधता येत नाही.
- वादळे होतात म्हणून सागर कधी आटत नाही.
- स्वप्न आणि सत्य यातील प्रवासाला जीवन असे म्हटले जाते.
- दुसऱ्या पेक्षा अधिक सुखी होण्याची इच्छा बाळगली नाही तर प्रत्येक माणूस सुखी होऊ शकेल.
- उत्कर्षाचे दिवस आले की विनयाने वागा.
- लेखणी ही जन्मजात देणगी असून ती अभ्यासाने व चिंतनाने कमवावी लागते.
- पैसा ही खरी लक्ष्मी नसून शांती हीच खरी लक्ष्मी आहे.
- कृती शब्दापेक्षा मोठ्याने बोलत असते.
- चंचल मन हे दुःखाचे सागर तर निर्मळ मन हे सुखाचा सागर आहे.
- निंदा आणि स्तुती झोक्याप्रमाणे असते, त्याने माणसाची प्रगती होत नसते.
- दयाळूपणा हा अंतःकरणाचा धर्म आहे ,हाताचा नव्हे.
- प्रेम व सद्गुण हेच मानवाचे खरे वैभव.
- शिक्षणाची मुळे कडु असली, तरी त्याची फळे मधुर असतात.
- घोर अत्याचार व अपमान मनुष्याला निराशावादी बनवतात.
- कर्तव्याच्या वेदीवर स्वेच्छेने आत्मसमर्पण करणे, हेच जीवनाचे सौंदर्य आहे.