प्रश्न १. उत्तरे सांगा 

अ. मिनू चे घर कोठे होते ?

उत्तर : मिनू चे घर शेतात होते.

आ. मिनू कोणा कोणाला भेटली ?

उत्तर : मिनू कोंबडी, कबूतर, मोर आणि बदकाला भेटली.

इ. मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला ?

उत्तर : मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला.

ई. पिसे कोणाची होती ? 

उत्तर : पिसे बदकाची होती.

उ. बदकाने मिनूला काय सांगितले ?

उत्तर : बदक मिनूला म्हणाले,“एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत“.

 प्रश्न २. रिकाम्या जागी जोडणाऱ्या योग्य पर्याय पुढे ✔️ अशी खूण करा 

पिसे सापडल्यावर मीनूला.,…..

  1. पिसे कोणाचे आहेत हे माहिती करून घ्यायचे होते.      ✔️
  2. पिसे घरी न्यायची होती.

 प्रश्न ३. जोड्या जुळवा

अ गट ब गट 

१.बदक अ. झाड 

२.कोंबडी आ. नदी 

३.कबुतर इ. खुराडे 

उत्तर :

अ गट ब गट

१.बदक अ. नदी

२.कोंबडी आ. खुराडे

३.कबुतर इ. झाड

प्रश्न ४.  उदाहरणे वाचा त्याप्रमाणे लिहा.

उदाहरणे –

घर –  घरापासून 

घर  – घराजवळ 

खुराडे – खुराड्यात 

उत्तर :

गाव – गावाजवळ / गावात

पाय – पायात

तळे – तळ्यात / तळ्याजवळ

घरटे – घरट्यात