प्रश्न १. उत्तरे सांगा
अ. मिनू चे घर कोठे होते ?
उत्तर : मिनू चे घर शेतात होते.
आ. मिनू कोणा कोणाला भेटली ?
उत्तर : मिनू कोंबडी, कबूतर, मोर आणि बदकाला भेटली.
इ. मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला ?
उत्तर : मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला.
ई. पिसे कोणाची होती ?
उत्तर : पिसे बदकाची होती.
उ. बदकाने मिनूला काय सांगितले ?
उत्तर : बदक मिनूला म्हणाले,“एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत“.
प्रश्न २. रिकाम्या जागी जोडणाऱ्या योग्य पर्याय पुढे ✔️ अशी खूण करा
पिसे सापडल्यावर मीनूला.,…..
- पिसे कोणाचे आहेत हे माहिती करून घ्यायचे होते. ✔️
- पिसे घरी न्यायची होती.
प्रश्न ३. जोड्या जुळवा
अ गट ब गट
१.बदक अ. झाड
२.कोंबडी आ. नदी
३.कबुतर इ. खुराडे
उत्तर :
अ गट ब गट
१.बदक अ. नदी
२.कोंबडी आ. खुराडे
३.कबुतर इ. झाड
प्रश्न ४. उदाहरणे वाचा त्याप्रमाणे लिहा.
उदाहरणे –
घर – घरापासून
घर – घराजवळ
खुराडे – खुराड्यात
उत्तर :
गाव – गावाजवळ / गावात
पाय – पायात
तळे – तळ्यात / तळ्याजवळ
घरटे – घरट्यात