प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
- मुलांची सहल कोठे गेली होती ?
उत्तर : मुलांची सहल गावच्या आमराई मध्ये गेली होती.
आ ) सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते?
उत्तर : सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या तसेच चित्रकलेचे साहित्य सोबत नेले होते.
इ) बाईने आमराईचा अर्थ काय सांगितला ?
उत्तर : आमराई म्हणजे, आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात .
ई) आमराई मध्ये मुले कोणते खेळ खेळली?
उत्तर : लपाछपी, शिवणापाणी, ऊनसावली असे वेग वेगळे खेळ मुलं खेळली.
प्रश्न २. ऊनसावली , शिवणापाणी यासारखे तुम्ही कोणकोणते खेळ खेळतात त्याची माहिती सांगा.
उत्तर : आम्ही आमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर लंगडी , साखळी , पकडापकडी असे खेळ खेळतो .
प्रश्न ३. तुमच्या घरी आंबा व कैरी पासून कोणकोणते पदार्थ बनवतात ते लिहा.
उत्तर : आमच्याकडे आंब्याचा मुरांबा ,वडी, बर्फी ,पापड , आंबारस तसेच कैरीचे लोणचे , पन्हे, चटणी , गुळांबा असे विविध पदार्थ बनवले जातात.
प्रश्न ४. तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा .
उत्तर : मुलांनी हे कार्य स्वत: करावे .