प्रश्न १.  एका वाक्यात उत्तरे लिहा. 

  1. मुलांची सहल कोठे गेली होती ? 

      उत्तर : मुलांची सहल गावच्या आमराई मध्ये गेली होती. 

आ ) सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते?

 उत्तर : सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या तसेच चित्रकलेचे साहित्य सोबत नेले होते. 

इ)  बाईने आमराईचा अर्थ काय सांगितला ? 

उत्तर :  आमराई म्हणजे, आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात . 

ई) आमराई मध्ये मुले कोणते खेळ खेळली?

उत्तर : लपाछपी, शिवणापाणी, ऊनसावली असे वेग वेगळे खेळ मुलं खेळली.

 प्रश्न २.  ऊनसावली , शिवणापाणी यासारखे तुम्ही कोणकोणते खेळ खेळतात त्याची माहिती सांगा. 

उत्तर :  आम्ही आमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर लंगडी , साखळी , पकडापकडी असे खेळ खेळतो . 

 प्रश्न ३.  तुमच्या घरी आंबा व कैरी पासून कोणकोणते पदार्थ बनवतात ते लिहा. 

उत्तर : आमच्याकडे आंब्याचा मुरांबा ,वडी, बर्फी ,पापड , आंबारस  तसेच  कैरीचे लोणचे , पन्हे, चटणी , गुळांबा असे विविध पदार्थ बनवले जातात. 

 प्रश्न ४.  तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा .

उत्तर :  मुलांनी हे कार्य स्वत: करावे .