प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ ) पत्र कोणी पाठवले?
उत्तर : पत्र काकांनी पाठवले होते.
आ ) पत्र कोणाला पाठवले?
उत्तर : पत्र रेश्माला पाठवले होते.
इ ) मायाला पत्र का वाचता आले नाही?
उत्तर : पत्र कोरे असल्यामुळे मायाला वाचता आले नाही .
प्रश्न २. कोण ते सांगा.
अ ) कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी .
उत्तर : माया
आ ) कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहित असणारी .
उत्तर : रेश्मा
प्रश्न ३. खालील शब्द असेच लिहा.
पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट
प्रश्न ४. खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वलपविराम घाला.
- मी संगणक सुरु केला मामाचा ई- मेल वाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो
उत्तर : मी संगणक सुरू केला. मामाचा ई-मेल वाचला. मामा चार दिवसांनी येणार होता, आम्ही आनंदित झालो.
- रमेश सीता अनिता गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात
उत्तर : रमेश, सीता ,अनिता,गणेश हे सर्व जण दररोज बागेत खेळतात.
- तू जेवण केलेस का
उत्तर : तू जेवण केलेस का ?
- हे ऐकून आनंद झाला का
उत्तर : हे ऐकून तुला आनंद झाला का ?
- मी आई बाबा राजू पिंकी बाजारात गेलो
उत्तर : मी ,आई ,बाबा, राजू , पिंकी बाजारात गेलो.
- सुशांत रघू राजेश हे चांगले मित्र आहेत
उत्तर : सुशांत ,रघू ,राजेश हे चांगले मित्र आहेत .