प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ ) पत्र कोणी पाठवले?

उत्तर : पत्र काकांनी पाठवले होते.  

आ ) पत्र कोणाला पाठवले?

उत्तर : पत्र रेश्माला पाठवले होते.  

इ ) मायाला पत्र का वाचता आले नाही?

उत्तर : पत्र कोरे असल्यामुळे मायाला वाचता आले नाही . 

प्रश्न २. कोण ते सांगा.

अ ) कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी . 

उत्तर :  माया 

आ ) कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहित असणारी . 

उत्तर : रेश्मा 

प्रश्न ३. खालील शब्द असेच लिहा.

        पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट 

प्रश्न ४. खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वलपविराम घाला.

  1. मी संगणक सुरु केला मामाचा ई- मेल वाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो

उत्तर : मी संगणक सुरू केला.  मामाचा ई-मेल वाचला.  मामा चार दिवसांनी    येणार होता,  आम्ही आनंदित झालो. 

  1. रमेश सीता अनिता गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात 

उत्तर : रमेश, सीता ,अनिता,गणेश हे सर्व जण दररोज बागेत खेळतात.  

  1. तू जेवण केलेस का 

उत्तर : तू जेवण केलेस का ? 

  1. हे ऐकून आनंद झाला का 

उत्तर :  हे ऐकून तुला आनंद झाला का ? 

  1. मी आई बाबा राजू पिंकी बाजारात गेलो 

उत्तर :  मी ,आई ,बाबा, राजू , पिंकी बाजारात गेलो.  

  1. सुशांत रघू राजेश हे चांगले मित्र आहेत 

उत्तर : सुशांत ,रघू ,राजेश हे चांगले मित्र आहेत .