प्रश्न १.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

 अ ) मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले .

 उत्तर : गोठ्यात एकच बैल पाहून मालतीला नवल वाटले. 

 आ ) मलण्णा डोक्याला हात लावून का बसला ?

 उत्तर : मलण्णा बैलाला सोडून खूप थकला आणि त्याला कुठेही बैल सापडला नाही     त्यामुळे शेती कशी करायची या विचाराने मलण्णा डोक्याला हात लावून बसला . 

इ ) बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला ?

उत्तर : गुरांच्या बाजारात मालतीने चोराला ओळखले आणि या माणसाने आमचा बैल चोरीला असे असे म्हणत मागे तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला.

ई ) मालतीने युक्ती करायचे का ठरवले ? 

 उत्तर : मालतीला माहिती होते की चोर आपल्याला सहजासहजी बैल देणार नाही म्हणून  मालतीने नियुक्ती करायचं ठरवले .

उ ) मालतीने कोणती युक्ती केली ? 

 उत्तर : मालतीने बैलाच्या डोळ्यांवर हात धरला व चोराला कुठला डोळा अधू आहे ते ओळखायला सांगितले . 

ऊ ) चोराची भंबेरी का उडाली ?

उत्तर : मालतीने केलेल्या युक्ती मुळे चोराने बैल चोरला आहे हे सिद्ध झाले व त्याची लबाडी लोकांसमोर आली त्यामुळे चोराची भंबेरी उडाली .

 प्रश्न २.  रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा .

 अ ) मालती ……….. बाहेर आली.

 उत्तर : मालती झटकन बाहेर आली .

 आ )एका बैलावर ……… कशी करायची ?

 उत्तर :  एका बैलावर शेती कशी करायची ?

इ ) तेवढ्यात मालतीला त्यांचा …………. बैल दिसला .

 उत्तर : तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला . 

ई ) बैला भोवती लोकांची ……… जमली .

 उत्तर : बैला भोवती लोकांची गर्दी जमली .

उ ) सगळ्यांनी मालतीच्या ………… कौतुक केले . 

 उत्तर : सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले.

 प्रश्न ३ पटकन झटकन यासारखे आणखी शब्द लिहा .

उत्तर :

  •  चटकन
  • मटकन
  • चटकन
  • खटकन
  • लटकन

 प्रश्न ४.  आरडाओरडा , सहजासहजी हे जोडशब्द आलेली पाठातील वाक्य लिहा .

 उत्तर :

१. या माणसाने आमचा बैल चोरीला असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली.  

२. हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही . 

 प्रश्न ५. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा. 

अ ) खरेदी x विक्री

आ ) लहान x मोठा 

इ ) डावा x उजवा 

 प्रश्न ६. खालील शब्द असेच लिहा 

       दोन्ही, गोष्टी , विक्री ,निरीक्षण , गर्दी, स्त्री