प्रश्न १. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ ) मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले .
उत्तर : गोठ्यात एकच बैल पाहून मालतीला नवल वाटले.
आ ) मलण्णा डोक्याला हात लावून का बसला ?
उत्तर : मलण्णा बैलाला सोडून खूप थकला आणि त्याला कुठेही बैल सापडला नाही त्यामुळे शेती कशी करायची या विचाराने मलण्णा डोक्याला हात लावून बसला .
इ ) बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला ?
उत्तर : गुरांच्या बाजारात मालतीने चोराला ओळखले आणि या माणसाने आमचा बैल चोरीला असे असे म्हणत मागे तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला.
ई ) मालतीने युक्ती करायचे का ठरवले ?
उत्तर : मालतीला माहिती होते की चोर आपल्याला सहजासहजी बैल देणार नाही म्हणून मालतीने नियुक्ती करायचं ठरवले .
उ ) मालतीने कोणती युक्ती केली ?
उत्तर : मालतीने बैलाच्या डोळ्यांवर हात धरला व चोराला कुठला डोळा अधू आहे ते ओळखायला सांगितले .
ऊ ) चोराची भंबेरी का उडाली ?
उत्तर : मालतीने केलेल्या युक्ती मुळे चोराने बैल चोरला आहे हे सिद्ध झाले व त्याची लबाडी लोकांसमोर आली त्यामुळे चोराची भंबेरी उडाली .
प्रश्न २. रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा .
अ ) मालती ……….. बाहेर आली.
उत्तर : मालती झटकन बाहेर आली .
आ )एका बैलावर ……… कशी करायची ?
उत्तर : एका बैलावर शेती कशी करायची ?
इ ) तेवढ्यात मालतीला त्यांचा …………. बैल दिसला .
उत्तर : तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला .
ई ) बैला भोवती लोकांची ……… जमली .
उत्तर : बैला भोवती लोकांची गर्दी जमली .
उ ) सगळ्यांनी मालतीच्या ………… कौतुक केले .
उत्तर : सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले.
प्रश्न ३ पटकन झटकन यासारखे आणखी शब्द लिहा .
उत्तर :
- चटकन
- मटकन
- चटकन
- खटकन
- लटकन
प्रश्न ४. आरडाओरडा , सहजासहजी हे जोडशब्द आलेली पाठातील वाक्य लिहा .
उत्तर :
१. या माणसाने आमचा बैल चोरीला असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली.
२. हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही .
प्रश्न ५. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.
अ ) खरेदी x विक्री
आ ) लहान x मोठा
इ ) डावा x उजवा
प्रश्न ६. खालील शब्द असेच लिहा
दोन्ही, गोष्टी , विक्री ,निरीक्षण , गर्दी, स्त्री