प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

  1. कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते?

उत्तर : प्राजक्ताची फुले टप टप आवाज करत जेव्हा मुलांच्या अंगावरती पडतात तेव्हा त्या तालावर मुलांचे गाणे जुळून येते.  

  1.  गवत खुशीने का डुलते?

उत्तर : झाडांखाली ऊन सावलीचा खेळ सुरू असताना मध्येच जोराचा वारा येतो म्हणून वाऱ्याबरोबर गवत खुशीने डुलते.

  1. मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते?

उत्तर : मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा व मोरपिसारा फुलतो. 

  1. कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे?

उत्तर : जे फुलांसारखे फुलत नाही, सुरात सुर मिसळत नाही व जे गाणे गात नाहीत त्या सर्वांना खुळे म्हंटले आहे. 

प्र. २. कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.

  1. कुरणावरती, ………………………….

उत्तर : कुरणावरती , झाडाखाली ऊनसावली विणते जाळी 

  1. हसते धरती, ………………………….

उत्तर : हसते धरती , फांदीवरती हा झोपाळा झुले !

  1. पाऊस, वारा …………………………….

उत्तर : पाऊस , वारा , मोरपिसारा या गाण्यातुन फुले !

  • खेळूया शब्दांशी
  1. ‘टप टप’ या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा.

उत्तर :  भिर भिर , झुळझुळ , दूरदूर , लुकलुक 

  1. खाली दिलेल्या ‘अ’ गट व ‘ब’ गट यांमधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा.
C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-19 at 12.13.31.png

उत्तर : 

हसरी – धरती

झुळझुळ – वारा

लुकलुक – तारा

फांदी – झोपाळा

(इ) खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा- मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

१) कुरणावरती – कुरण , वरती , वर , तीर , रण 

२) झाडाखाली – झाड , खाली , झाली , खाडा

३)  ऊनसावली – ऊन , सावली , नव , ऊस , वसा , वन ,नऊ , साली

(ई) खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोध व लिहा.

उदा., बरे वाईट

C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-19 at 12.13.31 (1).png

उत्तर : 

अशुभ X शुभ

लहान X मोठे

वाईट X बरे

तोटा X नफा

दुःख X आनंद

बाहेर X आत

उतार X चढ

अपयश X यश

  • खेळ खेळूया . 
  • खालील वाक्यडोंगर वाचा. त्याप्रमाणे दिलेल्या शब्दांचा वाक्यडोंगर बनवा. 
C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-19 at 12.13.32.png

उत्तर : 

शाळा 

शाळेत जाते. 

मिना शाळेत जाते. 

मिना रोज शाळेत जाते.

मिना रोज चालत शाळेत जाते. 

मिना रोज आईबरोबर चालत शाळेत जाते.

मिना आनंदाने रोज आईबरोबर चालत शाळेत जाते.