प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
- कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते?
उत्तर : प्राजक्ताची फुले टप टप आवाज करत जेव्हा मुलांच्या अंगावरती पडतात तेव्हा त्या तालावर मुलांचे गाणे जुळून येते.
- गवत खुशीने का डुलते?
उत्तर : झाडांखाली ऊन सावलीचा खेळ सुरू असताना मध्येच जोराचा वारा येतो म्हणून वाऱ्याबरोबर गवत खुशीने डुलते.
- मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते?
उत्तर : मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा व मोरपिसारा फुलतो.
- कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे?
उत्तर : जे फुलांसारखे फुलत नाही, सुरात सुर मिसळत नाही व जे गाणे गात नाहीत त्या सर्वांना खुळे म्हंटले आहे.
प्र. २. कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.
- कुरणावरती, ………………………….
उत्तर : कुरणावरती , झाडाखाली ऊनसावली विणते जाळी
- हसते धरती, ………………………….
उत्तर : हसते धरती , फांदीवरती हा झोपाळा झुले !
- पाऊस, वारा …………………………….
उत्तर : पाऊस , वारा , मोरपिसारा या गाण्यातुन फुले !
- खेळूया शब्दांशी
- ‘टप टप’ या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा.
उत्तर : भिर भिर , झुळझुळ , दूरदूर , लुकलुक
- खाली दिलेल्या ‘अ’ गट व ‘ब’ गट यांमधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा.

उत्तर :
हसरी – धरती
झुळझुळ – वारा
लुकलुक – तारा
फांदी – झोपाळा
(इ) खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा.
उदा., मोरपिसारा- मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.
१) कुरणावरती – कुरण , वरती , वर , तीर , रण
२) झाडाखाली – झाड , खाली , झाली , खाडा
३) ऊनसावली – ऊन , सावली , नव , ऊस , वसा , वन ,नऊ , साली
(ई) खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोध व लिहा.
उदा., बरे वाईट

उत्तर :
अशुभ X शुभ
लहान X मोठे
वाईट X बरे
तोटा X नफा
दुःख X आनंद
बाहेर X आत
उतार X चढ
अपयश X यश
- खेळ खेळूया .
- खालील वाक्यडोंगर वाचा. त्याप्रमाणे दिलेल्या शब्दांचा वाक्यडोंगर बनवा.

उत्तर :
शाळा
शाळेत जाते.
मिना शाळेत जाते.
मिना रोज शाळेत जाते.
मिना रोज चालत शाळेत जाते.
मिना रोज आईबरोबर चालत शाळेत जाते.
मिना आनंदाने रोज आईबरोबर चालत शाळेत जाते.