प्र. १. कोण ते लिहा.
- शब्दांच्या घरात राहणारे
उत्तर : हळवे स्वर
- घरात एकोप्याने खेळणारे
उत्तर : काना , मात्रा , वेलांटी
- अवतीभवती झिरपणारे
उत्तर : कळीजभर गाणे
प्र. २. कवितेच्या खालील ओली पूर्ण करा.
१. घरात होता, ………………….
…………………………..अक्षर-खेळ
उत्तर : घरात होता, कान–मात्र–वेलांटीचा खेळ
एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर-खेळ
२. एखाद्याची …………………………..
………………………. भान
उत्तर : एखाद्याची धुसफुससुद्धा हवीहवीशी छान
प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान
३. कानोकानी ………………………………..
……………………………कवितेचाही लळा
उत्तर : कानोकानी कुजबुजताना अंकुर मनकोवळा
वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा
- खेळूया शब्दांशी
(अ) खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उदा., लांटीवे वेलांटी
(१) सफुधुस = धुसफुस
(२) रकुअं = अंकुर
(३) कानीकानो = कानोकानी
(आ) खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा.
(१) सुंदर घर
(२) हळवे स्वर
(३) मनकोवळा अंकुर
(४) मोकळी वाट
(इ) खालील शब्द साखळी पूर्ण करा
उदा., सुनीता → तारा → राघवेंद्र → द्रव → वजन → नमन → नवल
खालील चौकटी वाचा. त्याप्रमाणे प्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा.
(अ) कप→ काटा →किसणी →कीव →कुसुम→ कूट→केर →कैरी →कोपरा →कौल →कंठ
(आ) सण → साहित्य →सिमला →सीता →सुमन → सूत → सेज → सैराट → सोपान→सौरभ→संत
- शब्दकोडे सोडवूया.
खालील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यये बनवा व दिलेल्या जागेत लिहा.

उत्तर :
- नंतर
- सकट
- वर
- खाली
- नजीक
- प्रमाणे
- समोर
- पुढे
- पणे
- तील