श्री

२० ऑगस्ट २०२१

प्रिय आज्जी,

सप्रेम नमस्कार…कशी आहेस तू ? मजेत आहेस ना ? तुझी तब्येत चांगली असेल अशी आशा करते. पाऊस आहे का गावी?? इथे अजूनही पाऊस चालूच आहे.

आज्जी या वर्षी गणपती बाप्पा १० सप्टेंबरला शुक्रवारी येणार आहेत आपल्या घरी. त्यासाठी तुलाही इथे यायचे आहे. तुला घेण्यासाठी बाबा २९ ऑगस्ट गावी येतील. त्याआधी तुझी सगळी तयारी करून ठेव. कपडे वगैरे तयार ठेव. कधी एकदा तुला भेटते असे झाले आहे.

आम्ही गणपतीत खूप काही कार्यक्रम करायचे ठरवले आहे. काका, मोठे काका सगळे येणार आहेत. तू आलीस की सांगते सगळं. तू ये लवकर. बाबा येतीलच.

तुझी चिनू

प्रति
श्रीमती. राधा सखाराम केतकर
खालची आळी,
राजापूर,रत्नागिरी ४१६७०२

प्रेषक,
चिन्मयी जगदीश केतकर
६०२ – फुलोरा
बोरिवली प-४०००९२