२ सप्टेंबर २०२१
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
रविकिरण प्राथमिक विद्यालय,
मुंबई ७१
विषय : ४ दिवस सुट्टीकरता अर्ज
माननीय मुख्याध्यापक
मी रजनी माने इयत्ता ४ अ मध्ये शिकणारी विद्यार्थिनी. माझ्या सख्ख्या भावाचे लग्न ६ ऑक्टोबर रोजी माझ्या गावी शिरगाव,सांगली येथे आहे. त्याकरिता मला ४ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर पर्यंत सुट्टी हवी आहे. माझा अभ्यास मी भरून काढीन. आपणास कोणतीही तक्रार येणार नाही .
आपणास नम्र विनंती आहे कि कृपया माझी रजा मंजूर करावी.
आपली कृपाभिलाषी
रजनी माने
रजनी माने
२०४ आशीर्वाद कॉ-ऑप सो.
चेंबूर ७१