समुद्राचे आत्मकथन (मराठी माध्यम २०२२)
निळा मी…. हिरवा मी…. फेसाळणाऱ्या लाटांचा मी…..
सतत किनाऱ्याला आदळणाऱ्या माझ्या लाटा म्हणजे माझा आवाजच जणू ! आलं का माझं नयनरम्य दृश्य डोळ्यासमोर?
माझं अथांग, रहस्यमय आणि मनाला शांत करणार रूप सर्वाना आकर्षित करीत असतं. कधी सूर्याच्या तेजाने चमकणार माझं पाणी तर कधी चंद्राच्या शीतल चांदण्याने लकाकणार माझं पाणी. हे माझं मंत्रमुग्ध करणारे रूप अनेक रसिक, कवी, लेखक आणि यात्रेकरूंना आकर्षित करतं. ज्यामुळे माझ्या किनाऱ्यालगतच्या लोकांना आर्थिक प्राप्तीचे साधन मिळते.
या लाटांवर स्वार होणाऱ्या होड्या लयबद्ध लाटांसोबत गाणं गात असतात. समुद्रकिनाऱ्यावर राहणारे माझे काही कोळी मित्र माझ्या पोटात सापडणाऱ्या अनेक माशांवरच आपले उदरनिर्वाह करतात. माझा आत असणारा खनिज तेलाचा साठा ही प्रचंड आहे.
पृथ्वीवरचा ७१% भाग हा समुद्राचा आहे. माझे पाणी खारे असले तरी पृथ्वीवर पडणाऱ्या पावसाचे चक्र माझ्यामुळेच सुरळीत चालते. म्हणजेच पाण्याचा मी एक महत्वाचा स्रोत आहे. समुद्रमार्ग हे व्यापारी दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. अनेक महत्वाच्या व जडमालाची वाहतूक समुद्र मार्गानेच होत असते. वातावरण बदलाची क्षमता माझ्यात आहे. माझ्यावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळेच हवामान संतुलित राहते.
माझा पोटात खूप गूढरहस्ये आहेत. तसेच खजिनेही (वनस्पती,वन्यजीव) आहेत, ज्याचा औषधे म्हणून उपयोग होतो. हे वन्यजीव पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत.
पण इतका विशाल, सुंदर, नयनरम्य, उपयुक्त असूनही आज माझ्या तळाशी काय आहे माहीत आहे? प्लास्टिकचा प्रचंड कचरा, घाण, माणसाने बनवलेल्या अनैर्सगिक गोष्टी, त्या मला अस्वच्छ करत आहेत. माझ्या आत राहणाऱ्या अनेक जीवांना आणि मला जगणे अशक्य करत आहेत. माझे सौंदर्य, माझी उपयुक्तता कमी करत आहे.
माणसाने माझ्या अस्तित्वाची जाणीव ठेवावी, आणि माझं रक्षण करावं. कारण मी आहे तरच पृथ्वीवर जीवन आहे.