वीज बचत काळाची गरज (SSC-2025)
कोणतीही क्रिया करण्याकरिता लागणारी क्षमता म्हणजेच ऊर्जा किंवा शक्ती….असे अनेक ऊर्जेचे स्रोत मानवाने शोधून काढले. त्यातलीच विद्युत ऊर्जा जिला आपण वीज म्हणून ओळखतो. आजपर्यंत लागलेल्या महान शोधांपैकी एक म्हणजे वीज. तंत्रज्ञानाच्या युगात आज सर्व उपकरणे विजेवर चालतात. पंखा, दूरचित्रवाणी, शीतकपाटे, वातानुकूलित यंत्र, संगणक, गाड्या, मोबाईल, कारखान्यातील यंत्र. शेतीला पाणी देताना विजेची यंत्रणा नदीचे पाणी शेतात घेऊन येते. शेतकर्यापासून ते देशाच्या राष्ट्रपती सर्वांचे जीवन ह्या वीजेमुळे सुखकर झाले आहे.
त्यामुळे वीज नसेल तर दैनंदिन जीवन मंदावेल. विजेने मानवाचे जीवन फारच सुखकर बनवले आहे, पण विजेची बचत करणे ही आता काळाची गरज बनली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मागणी जास्त व पुरवठा कमी अशी वेळ आता आली आहे. तसेच विजेचा अनावश्यक वापर व वीज बनवण्यासाठी लागणारी साधने यांचा तुटवडा भासू लागला आहे. ही धोक्याची घंटा आहे.
कोळसा, तेल, वायू यांचा उपयोग वीज निर्मिती करतान होतो. पण पण पृथ्वीच्या पोटातील हे ऊर्जेचे स्रोत संपत चालले आहेत. ज्यामुळे भविष्यात याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
विजेचा आवश्यक तितकाच वापर केला पाहिजे. खोलीत नसताना पंखा, लाईट चालूच ठेवणे अयोग्य आहे. ऊर्जा कार्यक्षम प्रमाणित उपकरणे वापरणे, उपकरणे वापरून झाल्यावर त्यांचा प्रवाह खंडित करणे या गोष्टी करून विजेची बचत करायला हवी. तरच मानवाचे देशाचे भविष्य उज्ज्वल होईल.
“वीज वाचवा पर्यावरण वाचवा”