दिनांक २० नोव्हेंबर २०२०
प्रिया आदित्य,
आज पत्र पाठवण्याचे कारण म्हणजे २७ नोव्हेंबर ला तुझा ११ वा वाढदिवस येत आहे. शाळा चालू
असल्या कारणाने मला तुझा वाढदिवसाला तिथे हजर राहता येणार नाही. म्हणून हे पत्र लिहीत आहे. तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
आपण एकत्र शाळेत होतो त्यावेळी वाढदिवसाला न चुकता एकमेकांच्या घरी असायचो. पण आता
बाबांच्या बदलीमुळे शहर, शाळा, मित्र पण बदलले. इथले नवीन मित्र छान आहेत. मला तुमची खूप आठवण
येते. आपण उन्ह्याळ्याच्या सुट्टीत नक्की भेटू.
तुझ्या आई बाबांना आणि अनु ताईला माझा नमस्कार.

तुझा मित्र,
संतोष

प्रति,
आदित्य सतीश चित्रे
१/३, श्रमसाफल्य
कोथरूड, पुणे-४११०३८

प्रेषक,
संतोष प्रांजळ परब
कृष्णा पॅलेस,
जी वि रोड
ठाणे प – ४००६०१