अचंबा वाटणे – आश्चर्य वाटणे.
वाक्य : आठ वर्षाच्या अमेयला पोहताना पाहून सर्वांना अचंबा वाटला.
अटकेपार झेंडे लावणे – खूप पराक्रम करणे.
वाक्य : नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून भारताचा झेंडा अटकेपार लावला आहे.
आकाश कोसळणे – फार मोठे संकट येणे.
वाक्य : चिपळूणला आलेल्या महापुरामुळे तिथल्या लोकांवर आकाश कोसळले आहे.
आकांडतांडव करणे – आरडाओरडा करणे.
वाक्य : आईबरोबर बाहेर जाण्यासाठी मिनूने आकांडतांडव केला.
आतुर होणे – उत्सुक होणे.
वाक्य : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सगळे आतुर असतात.
आधार देणे – मदत करणे.
वाक्य : दृष्टिहीन राजूला त्याचा मित्र नेहमी आधार देतो.
आनंद उतू जाणे – खूप आनंद होणे.
वाक्य : आपला मुलगा जिल्हाधिकारी झालेला समजताच बाबांचा आनंद उतू जात होता.
अंगाला कापरे सुटणे – खूप घाबरणे.
वाक्य : रस्त्यात समोर साप बघून मिनूच्या अंगाला कापरे सुटले.
अंगाला झोंबणे – शरीराची आग होणे.
वाक्य : मिरचीचे हात पूर्ण शरीराला लावल्यामुळे समीरचे अंग झोंबत होते.
अंगवळणी पडणे – सवय लागणे.
वाक्य : रोज सकाळी चालार्ला जाणे बाबांच्या अंगवळणी पडले आहे.
एक घाव दोन तुकडे करणे – ताबडतोब निर्णय घेणे.
वाक्य : आंदोलन करणाऱ्यांना नेहमीच सर्व गोष्टींचे एक घाव दोन तुकडे करायचे असतात.
अंजारणे गोंजारणे – प्रेमाने थोपटणे.
वाक्य : लहान बाळाला झोपवताना आई त्याला अंजारते गोंजारते.
कामात गढून जाणे – कामात मग्न होणे.
वाक्य : आई दिवसभर कामात गढून जाते.
कावरी बावरी होणे – गोंधळून जाणे.
वाक्य : गणिताचा प्रश्न बघून सविता कावरी बावरी होते.
केसाने गळा कापणे – विश्वासघात करणे.
वाक्य : पैशांसाठी भावाने भावाचाच केसाने गळा कापला.
गहिवरून येणे – खूप आनंद होणे.
वाक्य : माझे परीक्षेतील यश बघून आईला गहिवरून आले.
घर डोक्यावर घेणे – अतिशय गोंगाट करणे.
वाक्य : आम्ही सर्व भावंडे एकत्र आलो की घर डोक्यावर घेतो.
चिंतेत पडणे – काळजी वाटणे.
वाक्य : अफगाणिस्तानात अडकलेले भारतीय मायदेशी परत येईपर्यंत सर्वच चिंतेत पडले.
झटत राहणे – सतत प्रयत्न करणे.
वाक्य : सर्व उद्योजक आपला उद्योगधंदा वाढवण्यासाठी रात्रंदिवस झटत राहतात.
जीव भांड्यात पडणे – दिलासा मिळणे.
वाक्य : कोरोना झालेला मुलगा बरा होऊन घरी आल्यावर आईचा जीव भांड्यात पडला.
टाळाटाळ करणे – एखादी गोष्ट करायचे टाळणे.
वाक्य : काही कर्मचारी काम करण्यात खूप टाळाटाळ करतात.
ढसाढसा रडणे – खूप रडणे.
वाक्य : परीक्षेत कमी गुण मिळालेले पाहून मिनू ढसाढसा रडू लागली.
डोक्याला हात लावून बसणे – चिंताग्रस्त होऊन बसणे.
वाक्य : पूरामुळे झालेले नुकसान बघून सवय शेतकरी डोक्याला हात लावून बसलेत.
डोळा लागणे – झोप लागणे.
वाक्य : अभ्यास करताना मिनूचा नेहमी डोळा लागतो.
डोळे पाणावणे – आनंदाने डोळ्यात पाणी येणे.
वाक्य : आपल्या मुलीचे स्पर्धेतील यश पाहून पालकांचे डोळे पाणावले.
डोळ्यात तेल घालून पाहणे – लक्षपूर्वक पाहणे.
वाक्य : पालक आपल्या लहान मुलांची काळजी डोळ्यात तेल घालून घेतात.
थकून जाणे – खूप दमणे.
वाक्य : दिवसभर काम करुन बाबा खूप थकून जातात.
धाड धाड आपटणे – जोरजोरात आदळणे.
वाक्य : राग आल्यावर जमनू सगळ्या गोिी र्धाड र्धाड आपटते.
धुडकावून लावणे – नामंजूर करणे.
वाक्य : सहलीला जाण्याचा मिनूचा प्रस्ताव सर्वांनी धुडकावून लावला.
निर्धार करणे – निश्चय करणे.
वाक्य : राजूने सर्वांबरोबर चांगले वागण्याचा निर्धार केला आहे.
परोपकार करणे – निस्वार्थ मदत करणे.
वाक्य : काही श्रीमंत लोक नेहमी परोपकार करत असतात.
पाऊस धो-धो कोसळणे – खूप जोराचा पाऊस पडणे.
वाक्य : जुलै महिन्यात सर्वत्र पाऊस धो-धो कोसळला.
पाय लटलट कापणे – भीतीने पाय थरथर कापणे.
वाक्य : आपल्या शेतात वाघ बघून बबनरावांचे पाय लटलट कापू लागले.
पाळत ठेवणे – लक्ष ठेवणे.
वाक्य : पोलिस नेहमी चोरांवर पाळत ठेवून असतात.
पोटात कावळे ओरडणे – खूप भूक लागणे.
वाक्य : मी जेव्हा खेळून येतो, तेव्हा नेहमी माझ्या पोटात कावळे ओरडतात.
पोटात खड्डा पडणे – खूप भीती वाटणे.
वाक्य : बाबांचा राग पाहून माझ्या पोटात मोठा खड्डा पडतो.
पोटतिडकीने बोलणे – काळजी असणे/काळजीने बोलणे.
वाक्य : कोरोना काळात कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आपले पंतप्रधान पोटतिडकीने सर्वांना संगत होते.
बिलगणे – प्रेमाने मिठी मारणे
वाक्य : मांजर आपल्या पिल्लांना बिलगून झोपली होती.
मनमानी करणे – मनाला वाटेल तसे वागणे.
वाक्य : हिटलर त्याच्या जनतेबरोबर वागताना नेहमी स्वत:ची मनमानी करत असे.
भूमिगत होणे – लपून राहणे.
वाक्य : स्वराज्य मिळवण्यासाठी केलेल्या लढाईत क्रांजतकारी लोकांना नेहमी भूमिगत व्हावे लागायचे.
भंबेरी उडणे – खूप गोंधळून जाणे
वाक्य : समोरचा माणूस फाडफाड इंग्रजी बोलताना पाहून मिनूची भंबेरी उडून जाते.
भाव गगनाला भिडणे – खूप महाग होणे.
वाक्य : ह्यावर्षी पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत.
मग्न असणे – पूर्णपणे रमून जाणे.
वाक्य : चित्र काढताना शीला पूर्णपणे मग्न झालेली असते.
रक्ताचे पाणी करणे – खूप कष्ट करणे
वाक्य : मजदूर लोक आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी रक्ताचे पाणी करतात.
सुगावा लागणे – माजहती होणे
वाक्य : पोलिसांना चोराचा सुगावा लागताच त्यांनी त्याचा पाठलाग केला.
हुश्श करणे – मोकळा श्वास घेणे
वाक्य : माझा गृहपाठ पूर्ण झाल्यावर मी हुश्श केले.