(१) खालील चौकटी पूर्ण करा.

(अ) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी

उत्तर. चकोर

(आ) पिलांना सुरक्षितता देणारे

उत्तर. पक्षिणीचे पंख

(इ) स्वतःला मिळणार आनंद

उत्तर. स्वानन्दतृप्ती

(ई) व्यक्तीला सदैव सुख देणारा

उत्तर. योगीपुरुष

(२) खालील आकृती पूर्ण करा.

उत्तर. पांखोवा – पिलियांसी

जीवांसी – जीवन

चंद्रकिरण – चकोर

(३) खालील तक्ता पूर्ण करा.

योगीपुरुष आणि जीवन (पाणी) यांच्यातील फरक स्पष्ट करा.

योगीपुरुषजीवन (पाणी
१. सबाह्य निर्मळ करतो.१. वरवरचा मळ साफ करतो.
२. स्वानंद तृप्ती देतो.२. काही क्षणापुरतं तृप्त करतो.
३. सर्व इंद्रियांना शांत करतो.३.फक्त जीभेला तृप्त करते.
४. आत्मज्ञानाने उद्धार करतो.४. फक्त अन्नदान करते.

 (४) खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोध.

(अ) जीभ

उत्तर. रसना

(आ) पाणी

उत्तर. जल , उदक, जीवन

(इ) गोडपणा

उत्तर. मधुरता

(ई) ढग

उत्तर. मेघ

(५) काव्यसौंदर्य.

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.

तैसे योगियासी खालुतें येणें l जे इहलोकी जन्म पावणे l 

जन निववी श्रवणकीर्तने l निजज्ञाने उद्धरी ll

उत्तर. या अभंगात संत एकनाथांनी पाणी आणि योगीपुरुष यांची तुलना केली आहे. योगी पुरुषांचे या पृथ्वीवर जन्म घेणे हे कशासाठी आहे याचे वर्णन संत एकनाथ इथे करतात. जसा ढगांच्या मुखातून पाणी खाली येते म्हणजे जेव्हा पृथ्वीवर पाऊस पडतो. त्यावेळी त्या पाण्याने जनता तृप्त होते. त्यामुळेच सगळ्यांना अन्न लाभते. त्याचप्रमाणे योगी पुरुष यांच्या अमृत वाणीचे श्रवण कीर्तन केल्याने आत्मज्ञान मिळून माणसाचा उद्धार होतो.

(आ) ‘ योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर. पाणी हे फक्त शरीरावरच्या मळाला धुवते, तर योगी पुरुष अंतर्बाह्य शरीराला निर्मल करतात. ज्यावेळी आपण पाणी पितो त्यावेळीच आपल्याला सुख मिळते, पण योगी सदासर्वकाळ सुख देतात. पाण्याचे सुख हे क्षणिक असते, योगी पुरुषामुळे स्वानन्दतृप्ती मिळून, सुखाला कमतरता राहात नाही. पाण्यामुळे जिभेला गोडवा मिळतो, पण योगी पुरुषांचा गोडवा शरीरातल्या प्रत्येक भागाला शांत करतो. योगी पुरुषांची अमृत वाणी आत्मज्ञान देऊन उद्धार करते. तर पाण्यामुळे फक्त अन्न दान मिळते.

(ई) योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.उत्तर. योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही समाजाला बदलण्याचे काम करतात. पण पाणी हे फक्त बाह्य गोष्टीच निर्मळ करते, एक वेळची तहान भागवून जिभेला शांती देते. व अन्नदान करते. पण योगी पुरुष हे माणसाच्या जीवनात अंतर्बाह्य बदल घडवून आणतात. आतून व बाहेरून स्वच्छ करतात. त्यांच्यामुळे स्वानन्दतृप्ती मिळते व सुखाला पारावर राहात नाही. त्यांचा गोडवा सर्व शरीराला शांत करतो. त्यांच्यामुळे आत्मज्ञान मिळून उद्धार होतो.