प्र. १. एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) होळीला करायचा गोड पदार्थ – पुरणपोळी
(आ) केरकचरा टाकायचे ठिकाण – खड्डा
प्र. २. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
अ ) कवीने काय तोडण्यास मनाई केली?
उत्तर : कवीने वृक्ष तोडण्यास मनाई केली आहे .
आ ) होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?
उत्तर : होळीच्या वेळी सद्गुणांनी झोळी भरावी.
इ ) होळीसाठी मोळी कशाची बांधावी?
उत्तर : होळीसाठी अनिष्ट रूढी आणि प्रथांची मोळी बांधावी.
ई ) कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितले आहे?
उत्तर : पर्यावरणाचे भान ठेवून वृक्षतोड करू नये अशी शप्पथ होळीच्या दिवशी कवीने घ्यायला सांगितली आहे
उ ) कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?
उत्तर : कविच्या मताप्रमाणे होळी साजरी केली तर, निसर्ग राजा स्वतः त्याच्या घरी पाणी भरेल .
प्र. ३. ‘पर्यावरणाचे भान ठेऊन होळी साजरी करा’. याबाबत तुमचे मत दोन-तीन वाक्यांत लिहा.
उत्तर : होळी पेटवण्यासाठी लोक झाडे तोडतात त्यामुळे शुद्ध हवेचे प्रमाण कमी होत आहे . त्याचा परिणाम म्हणून प्रदूषण वाढत आहे . तसेच झाडे तोडल्यामुळे पावसाचे प्रमाण सुद्धा कमी होत आहे . त्यामुळे जर आपल्याला शुद्ध हवा व योग्य प्रमाणात पाणी पाहिजे असेल तर वृक्षतोड थांबवली पाहिजे .
प्र.४. ‘होळी’ च्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल?
उत्तर : सर्वात आधी मी माझ्या मित्रांबरोबर होळी पेटवण्यासाठी लाकडे जमा करू . त्यासाठी जुने फर्निचर गोळा करू . लोकांकडून टाकाऊ व जुने लकडी सामान गोळा करू . ते सर्व एकत्र करून होळी च्या आकारात बांधून ठेवू . त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढू . तसेच घरी आईला पुरणपोळी बनवण्यासाठी मदत करेल . रात्री सर्वांना एकत्र करून होळीचा सण साजरा करू . आणि हे सर्व करत असताना पर्यावरणाचे भान ठेवेल .
प्र.५. तुमच्या परिसरात ‘आदर्श होळी’ साजरी करण्यासाठी एक सूचनाफलक तयार करा.
सूचनाफलक
झाडे तोडू नका
टाकाऊ वस्तूंचीच होळी करा.
नैवद्य ठेवताना अन्न वाया जाणार नाही ह्याची काळजी घ्या .
लहान मुलांना होळीपासुन दूर ठेवा .
प्र. ७. होळी हा सण ‘फाल्गुन’ या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा.
उत्तर : उत्तरासाठी गाभा अॅप डाऊनलोड करा.
- खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.
नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नका.
ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा,
तरच प्रदूषणाला बसेल आळा.
पर्यावरणाचे भान ठेवा