प्र. १. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
- कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?
उत्तर: जेव्हा हाताच्या मुठीत धन-द्रव्य नसते व शरीरात रक्त नसते तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते.
- सैनिकाचे पाऊल जिद्धीचे का वाटते?
उत्तर: युद्धभूमीवर तोफगोळ्यांचा मारा होत असतो, बंदुकीतील गोळ्यांचा वर्षाव होत असतो. शिवाय धूरांचे लोट येत असतात. तरीही त्या परिस्थितीत सैनिक पुढे पुढे जात असतो. म्हणून सैनिकाचे पाऊल जिद्धीचे वाटते.
- डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते?
उत्तर: प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सैनिकाने मिळवलेल्या विजयाची घौडदौड डोळे भरून पाहावी.
प्र. २. योग्य पर्याय निवडा.
- सैनिकाचे औक्षण केले जाते…….
- भरलेल्या डोळ्यांनी/ भरलेल्या अंत:करणाने
- डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
- तबकातील निरांजनाने
- भाकरीच्या तुकड्याने
- उत्तर: सैनिकाचे औक्षण केले जाते डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
- कवितेतील ‘दिनदुबळे’ म्हणजे…..
- कष्टाचे, पैसे नसलेले
- सैनिकाबरोबर लढणारे
- शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले
- सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय
- उत्तर: कवितेतील ‘दिनदुबळे’ म्हणजे सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय
प्र. ३. काव्यसौंदर्य
- खालील ओळींचे रसग्रहण करा.
“अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण
दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण”
उत्तर: वरील ओळी सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार ‘इंदिरा संत’ ह्यांच्या औक्षण ह्या कवितेतील आहे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला सर्व देशवासीयांकडून औक्षण कवयित्रीने ह्या कवितेने केले आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन प्रस्तुत कवितेत व्यक्त केले आहे. हातात द्रव्य नसलेले किंवा शरीरात रक्त नसलेले सर्वच लोकांच्या मनात सैनिकांबद्दल अभिमान आहे. आपल्या डोळ्यांच्या निरंजनाने व अश्रुंच्या ज्योतीने सर्व देशभक्त लोक सैनिकांचे औक्षण करत आहेत असे कवयित्री इथे सांगते. सर्व लोकांमध्ये सैनिकांसारखे सीमेवर लढण्याचे सामर्थ्य नसते म्हणून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना कवयित्री स्वत: बरोबर सर्वांना दिनदुबळे म्हणत आहे.
- ‘सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो,’ या विधानातील भव स्पष्ट करा.
उत्तर: आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सैनिक सीमेवर नेहमी तैनात असतात. ऊन, थंडी, वारा, पाऊस या सर्व गोष्टींचा ते अजिबात विचार करत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी ते सदैव आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असतात. आपले सैनिक सीमेवर शत्रूबरोबर लढत असतात म्हणून आपण सुरक्षित आहोत. कुणीही कधीही कुठेही फिरू शकतो, रात्री निवांत झोपू शकतो. सैनिक स्वत: आपल्या कुटुंबाला सोडून सीमेवर लढत असतात. आपल्या जिवाची पर्व न करता आपल्यासाठी ते सीमेवर शत्रू बरोबर लढत असतात म्हणून आपण निष्काळजी राहू शकतो. सर्व सण-समारंभ साजरे करू शकतो.
- कवितेच्या संदर्भात दीनदुबळे याचा कावयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार ‘इंदिरा संत’ ह्यांच्या औक्षण ह्या कवितेत सीमेवर लढायला जाणाऱ्या सैनिकांचे औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन व्यक्त केले आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी ते सदैव आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असतात. आपल्या जिवाची पर्व न करता आपल्यासाठी ते सीमेवर शत्रू बरोबर लढत असतात म्हणून आपण निष्काळजी राहू शकतो. हातात द्रव्य नसलेले किंवा शरीरात रक्त नसलेले सर्वच लोकांच्या मनात सैनिकांबद्दल अभिमान आहे. आपल्या डोळ्यांच्या निरंजनाने व अश्रुंच्या ज्योतीने सर्व देशभक्त लोक सैनिकांचे औक्षण करत आहेत असे कवयित्री इथे सांगते. सर्व लोकांमध्ये सैनिकांसारखे सीमेवर लढण्याचे सामर्थ्य नसते. म्हणून सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या प्रत्येक देशवासीयाला कवयित्रीने दीनदुबळे म्हंटले आहे.
- देशसेवा हीच ईश्वरसेवा असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हाला काय करावेसे वाटते ते लिहा.
उत्तर: आपल्या जिवाची पर्व न करता आपल्यासाठी सैनिक सीमेवर शत्रू बरोबर लढत असतात. सैनिक स्वत: आपल्या कुटुंबाला सोडून सीमेवर लढत असतात. त्यांच्यासाठी देशसेवा हीच खरी ईश्वरसेवा असते. आपण जर त्यांच्या सारखे सीमेवर लढायला जाऊ शकत नाही तर आपण कमीत कमी आपल्या देशासाठी प्रामाणिक राहिले पाहिजे. देशाच्या शत्रूबरोबर हातमिळवणी न करता सर्व कामे प्रामाणिकपणे केली पाहिजेत. सैनिक प्रत्येक सणाला आपल्या कुटुंबांपासून दूर असतात. आपण कमीत कमी त्यांच्या कुटुंबाला सन्मानाने वागवले पाहिजे. त्यांच्या कुटुंबाची नेहमी मदत केली पाहिजे.