प्र. १. खालील आकृती पूर्ण करा.
अमृत व इसाब यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी.
↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓
उत्तर : कपडे कपड्याचा रंग कपड्याचा आकार कापड शाळा वर्ग घरे
प्र. २. खालील दिलेल्या वाक्यांचा योग्य घटनाक्रम लिहा.
- एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली.
- अमृत व इसबाने शर्टांची अदलाबदल केली.
- गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती.
- अमृत व इसबाच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले.
- हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तिथे जमल्या.
उत्तर :
- गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती.
- एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली.
- अमृत व इसबाने शर्टांची अदलाबदल केली
- हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तिथे जमल्या.
- अमृत व इसबाच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले.
प्र. ३. पुढील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार लिहा.
अ) घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी ……………………….
(गळ घातली, भुरळ घातली)
उत्तर : घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी गळ घातली.
आ) बाळू नवीन छत्री कोठेतरी विसरून आला. हे पाहून आईचा …………………..
(पारा चढला, कौतुक वाटले.)
उत्तर : बाळू नवीन छत्री कोठेतरी विसरून आला. हे पाहून आईचा पारा चढला.
इ) रस्त्यावर भांडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने नीताच्या …………………..
(पोटात कावळे ओरडले, पोटात गोळा आला.)
उत्तर : रस्त्यावर भांडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने नीताच्या पोटात गोळा आला.
ई) त्याची करुण कहाणी ऐकून सर्वांची मने …………………………
(हेलावून गेली, हबकून गेली.)
उत्तर : त्याची करून कहाणी ऐकून सर्वांची मने हेलावून गेली.
- खेळूया शब्दांशी.
- खाली दिलेल्या ‘अ’ व ‘ब’ गटातील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.

उत्तर :
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| नवा | शर्ट |
| कुस्ती | खेळ |
| सुई | दोरा |
| होळी | सण |
आ) खालील शब्दांतील अचूक शब्द लिहा.
अ) व्रात्य, वात्र्य, वार्त्य, व्रार्त्य
उत्तर : व्रात्य
- कप्लना, कल्पना, कलपना, कल्पना
उत्तर : कल्पना
- गोष्ट, गोश्ट, गोशट, गोष्टट
उत्तर : गोष्ट
इ) खालील आकृतीत ‘वान’ हा प्रत्यय लावून तयार झालेले शब्द दिले आहेत. हे शब्द अभ्यासा. ‘करी’ हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.

उत्तर :
कष्टकरी
वारकरी
शेतकरी
शाळकरी
माळकरी
- लिहिते होऊया.
- ‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर : माझी आवडती मैत्रीण ‘श्रावणी’ आहे. मी रोज तिला भेटते. तिचे घर माझ्या घराच्या बाजूलाच आहे, त्यामुळे आम्ही शाळेत जाताना व येताना एकत्र असतो आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही पूर्ण वेळ एकत्रच खेळतो. अभ्यास करताना सुद्धा आम्ही एकत्र बसतो.
- सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
उत्तर : सुट्टीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींनी बरोबर खूप वेगळेवेगळे खेळ खेळतो. जसे क्रिकेट, लगोरी, फुटबॉल, लपाछपी, बुद्दिबळ, टेबल-टेनिस, इत्यादि.
- तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हाला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?
उत्तर : मला श्रावणी मधले सर्वच गुण आवडतात. ती खूप हुशार व अभ्यासू आहे. ती खूप महत्तवाकांक्षी आहे. तिची एकाग्रता वाखणण्याजोगी आहे. मोठ्या माणसांचा आदर करणे व सर्वांना मदत करणे हे मी तिच्याकडून शिकले आहे.
खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा समानार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.

उत्तर :
१. डोके
२. केर
३. रजनी
४. नीर
५. रयत
६. तनया
खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.

उत्तर :
१. आळशी
२. शीतल
३. लहान
४. नवीन
५. नकार६. रडणे