प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
अ )अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घायला लावले?
उत्तर : अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले.
आ ) उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?
उत्तर : ज्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून व दुसऱ्या कानातून उठूनच बाहेर पडली नाही ती मूर्ती उत्कृष्ट मूर्ती.
इ ) कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?
उत्तर : अप्पाजींनी कलिंग राजाने दिलेल्या तीन पैकी उत्कृष्ट मूर्ती ओळखली तसेच तिन्ही मूर्तींचा दर्जा ओळखला त्यामुळे कलिंगचा राजा संतुष्ट झाला .
प्र. २. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अ ) अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
उत्तर : अप्पाजींनी बैलगाडी मध्ये गाडीवान बसल्यावर ती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरायला सांगितले. त्या मातीत कोबीचे बी पेरायला सांगितले. त्यानंतर त्या गाडीवानाला रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला सांगितले. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार झाली होती . अशाप्रकारे अप्पाजींनी कोबी कलिंग देशाकडे पाठवली.
आ ) कलिंगाच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
उत्तर : कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसरी परीक्षा घेतली. त्यात त्यांनी आप्पाजीना तीन मुर्त्या दाखवल्या, ज्या दिसायला सारख्या होत्या परंतु यातील एक मूर्ती निकृष्ट, दुसरी मूर्ती मध्यम दर्जाची आणि तिसरी उत्कृष्ट ,अशी होती आणि आप्पाजींना कलिंग राजाने, यातला फरक ओळखून कोणती मूर्ती उत्कृष्ट आहे ती ओळखायला सांगितले .
इ ) मूर्तीच्या तोंडात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
उत्तर : ज्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती मूर्ती निकृष्ट दर्जाची होती. म्हणजेच एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो, त्याचा खरेखोटेपणा पडताळून न पाहता जर तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचे हित होत नाही. असा अर्थ अप्पाजींनी लावला.
ई ) अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
उत्तर : अफवा ऐकल्यावर जो माणूस एका कानाने ऐकूण दुसऱ्या कानाने सोडून देत नाही किंवा लगेच दुसऱ्याला सांगत नाही , तर तिच्या खरे-खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही. तो माणूस उत्तम असे अप्पाजींचे मत आहे.
प्र. ३. पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?
उत्तर : पाणी घेऊन येताना मी झाकण असलेल्या भांड्याचा वापर करेल ज्यामुळे पाणी ने –आण करताना कुठेही सांडणार नाही . आणि तसेच मी एखाद्या वाहनाचा वापर करेल जेणेकरून मला एकाचवेळी जास्त पाणी नेता येईल .
प्र. ४. विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) हित X अहित
(आ) अवघड X कठीण
(इ) निकृष्ट X उत्कृष्ट
(ई) कीर्ती X अपकीर्ती
प्र. ५. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.
| गाडी-गाडीवान | चतुर-चतुराई | खरा-खरेपणा |
| धन-धनवान | महाग-महागाई | साधा-साधेपणा |
| दया-दयावान | स्वस्त – स्वस्ताई | शहाणा-शहाणपणा |
| बल-बलवान | नवल-नवलाई | भोळा-भोळेपणा |
प्र. ७. खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा.
(अ) दरी – ती दरी (स्त्रीलिंग)
(आ) पान – ते पान (नंपुसकलिंग)
(इ) माठ – तो माठ (पुल्लिंग)
(ई) लाडू – तो लाडू (पुल्लिंग)
(उ) पुस्तक – ते पुस्तक (नंपुसकलिंग)
(ऊ) वही – ती वही (स्त्रीलिंग)
प्र. ८. तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.
उत्तर : माझी मैत्रीण मिनू खूप हुशार आणि चतुर आहे . रस्त्यातून जाताना तिने पहिले की एक भामटा चोर एका आजीचे पाकीट चोरत आहे . हे पाहून ती धावत आजी जवळ पोहचली आणि आजी बरोबर गप्पा मारू लागली . त्यामुळे त्या चोराला वाटले की आजी एकटी नाही . आणि तो चोर तिथून निघून गेला .
प्र. ९. अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.
प्र. १०. खालील आकृतीत दिलेल्या शब्दांस विशेषणे लावा.
कोबी – ताजी , मोठी , महाग, रसदार
मूर्ती – डौलदार, उंचीपुरी , लोभस
- सांगा पाहू.
- शर्टाच्या खिशावर
रुबाबात बसतो,
काहीही लिहिण्यासाठी
माझ्याशिवाय पर्याय नसतो.
उत्तर : पेन
- वेली अन वनस्पतींनी
नटले मी फुलांनी,
खेळण्यासाठी मजेत
शोधले मला मुलांनी.
उत्तर : उद्यान
- दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यांत बदल करा.
१. रिमा सहलीला गेली. ( वाक्य भविष्यकाळी करा.)
उत्तर : रिमा सहलीला जाईल.
२. मला आंबा आवडतो. (वाक्य भूतकाळी करा.)
उत्तर : मला आंबा आवडला होता.
३. चंदाने लाडू खाऊन संपवला.( वाक्य वर्तमानकाळी करा.)
उत्तर : चंदा लाडू खाऊन संपवत आहे.
४. सुभाष माझा मित्र आहे. (वाक्य भूतकाळी करा.)
उत्तर : सुभाष माझा मित्र होता.
५. वंदना अभ्यास करते. (वाक्य भूतकाळी करा.)
उत्तर : वंदना अभ्यास करत होती.
६. संजू क्रिकेट खेळतो. (वाक्य भविष्यकाळी करा.)
उत्तर : संजू क्रिकेट खेळेल.
- पूर, गाव, नगर, बाद ही अक्षरे शेवटी असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहा.
| गाव | पूर | नगर | बाद |
| मानगाव | सोलापूर | अहमदनगर | औरंगाबाद |
| गिरगाव | कोल्हापूर | उल्हासनगर | दौलताबाद |
| गोरेगाव | शिंगणापूर | शिवाजीनगर | हैदराबाद |
| तळेगाव | बदलापूर | जुईनगर | गाजियाबाद |
| कुसगाव | खालापूर | श्रीनगर | उस्मानाबाद |