प्र. १. पुढील वाक्ये कोणत्या प्राण्यासंदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
- “जन्मापासून आंधळी आहे ती!”
उत्तर : मांजर
आ ) सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच!
उत्तर : कुत्र्याची पिल्लं
प्र. २. आकृत्या पूर्ण करा.
- मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या विविध सोई
उत्तर :
१. लहानशी पण स्वच्छ खोली.
२. आपल्या स्वयंपाक घरातील ओटाच्या उंचीचे कट्टे
३. जाळीने विभागलेले व बाहेरील बाजूने जाळ्या बसवलेल्या छोटे खण
४. प्रत्येक खंडात एका पेशंटची स्वतंत्र सोय
- लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी केलेल्या कृती
उत्तर :
१. जाळीवर नाक घासणे.
२ . नखांनी जाळ्यात खरवडणे.
३ . मियाँव मियाँव करणे.
४ . कलकलाट करणे.
- माणसांसारखी मांजरांची दवाखान्यात घेतलेली काळजी
उत्तर :
- औषध पाणी
- पथ्याचं खाणं पिणं
- डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची वैशिष्ट्ये
उत्तर :
१ . पांढरा रंग व सावरीच्या कापसा सारखे मऊ.
२ . इवले कान
३ . इवल्या शेपट्या
४ . लालसर ओली नाकं
५ . पोटातून येणारा कुई कुई आवाज
प्र. ३. ‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’ हे विधान पाठाधारे पटवून द्या.
उत्तर : लेखिका ‘शांता शेळके’ लिखित ‘आनंदाचे झाड’ या ललितलेखातून “आम्ही सारे हवे आहोत का”? या पाठांमध्ये माणसाच्या प्रेमासाठी आसुरलेल्या प्राणी विश्वाचे चित्रण फार सुंदर केले आहे. लेखिका जेव्हा परळच्या एका प्राण्यांच्या इस्पितळांमध्ये भेट देते, तेव्हा तिथे बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी, अशा वेगवेगळ्या जनावरांची चित्र दिसतात.
लेखिका सर्वात आधी एका काळभोर बोक्याला भेटते. तेव्हा त्यांच्या नजरेत लेखिकेला व्याकुळता दिसते. ती जेव्हा मांजरांच्या कक्षात जाते, तेव्हा प्रत्येक मांजर आपापल्या परीने त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे लेखिकेला वाटते. “मला इथे फार एकट वाटतंय, जरा माझ्याकडे या हो. मला कुरवाळा.” असेच जणू प्रत्येक मांजर म्हणते, असे लेखीकेला वाटते. मग लेखिका जेव्हा जाळीच्या छिद्रातून बोट घालून कुणाचे डोके खाजवते , कुणाचा गळा खाजवते, तर कुणाचा कान कुरवाळते तेव्हा मांजर खुश होऊन पोटातून गुर्र गुर्र आवाज करून समाधानाची पावती देतात. पुढे लेखिका जेव्हा कुत्र्यांच्या कक्षामध्ये जाते, तेव्हा एक कुत्रा लेखिकेला आपले दोन्ही पण जुळवून नमस्कार करण्याचा प्रयत्न करतो. तसेच एक आंधळी मांजर जेव्हा लेखिकेच्या पायाजवळ जाते, तेव्हा लेखिका तिच्या पाठीवर हात ठेवते आणि मांजर लेखीकडे जाऊन प्रेमाने गुर्र गुर्र करू लागते. या सर्व प्रसंगांवरून असेच वाटते की ‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात.’
- खेळूया शब्दांशी.
अ) कंसातील शब्दसमूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
(लक्ष वेधून घेणे, आवाहन करणे, निभाव लागणे)
- सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच
उत्तर : सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच निभाव लागला नाही.
- चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे
उत्तर : चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.
- पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी
उत्तर : पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले.
(आ) दिलेल्या शब्दापुढे कंसातील विरुद्धार्थी शब्द लिहा.
(इवले, शांत, खरखरीत)
अ ) रागीट X शांत
आ ) मोठे X लहान
इ ) मऊमऊ X रखरखीत
(इ) ‘जोडशब्द’ लिहा.
अ) चढ –चढउतार
आ) अंथरूण – अंथरूणपांघरून
इ) इकडून – इकडूनतिकडे
ई) आले – आलेगेले
- भाषासौंदर्य
- खालील म्हणी पूर्ण करा.
१ मूर्ती लहान पण कीर्ती महान.
२ शितावरून भाताची परीक्षा.
३ सुंठीवाचून खोकला गेला.
४ रात्र थोडी सोंगे फार.
५ उथळ पाण्याला खळखळाट फार.
६ दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
७ झाकली मूठ सव्वालाखाची.
८ घरोघरी मातीच्या चुली.
९ कोल्हयाला द्राक्षे आंबट.
१० अंथरुण पाहून पाय पसरावे.
११ इकडे आड तिकडे विहीर. १२ काखेत कळसा गावाला वळसा.