प्रश्न १ . एका वाक्यात उत्तरे लिहा
अ) बैलांच्या सणाला काय म्हणतात ?
उत्तर : बैलांच्या सणाला बैलपोळा म्हणतात.
आ ) बैलांना कसे सजवले जाते ?
उत्तर : मखमली झुली व रेशमी बाशिंगे घालून बैलांना सजवले जाते.
इ ) बैलांची नावे कोणती आहेत ?
उत्तर : ढवळ्या व पवळ्या अशी बैलांची नावे आहेत .
ई ) बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात ?
उत्तर : बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात.
प्रश्न २. शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
उदाहरणार्थ : मखमली – जुली
उत्तर :
गोठ्यातील – बैल
ढवळ्या – पवळ्या
प्रश्न ३. बैल गोठ्यात राहतात तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा .
घोडा – तबेला
वाघ – गुहा
माकड – झाड
हत्ती – जंगल
मासा – पाणी
कासव – पाणी व जमीन
प्रश्न ४ खालील शब्दापासून अनेक शब्द बनवा.
उदाहरणार्थ – कपाळी-कळी, पाळी ,पाक, पाकळी
अ ) पुरणपोळी – पुरण, पोळी,पोर, पुर ,पुळी .
आ ) गावभर – गाव, वर ,भर ,गार.
प्रश्न ५. ‘सजलेधजले ‘अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा असे आणखी काही जोडशब्द लिहा .
- काम धाम
२ . पुरणपोळी
३ . ढवळ्या पवळ्या
प्रश्न ६. ‘गावभर मिरवणे’ म्हणजे संपूर्ण गावात फिरणे. खालील शब्दांना भर हा शब्द जोडा आणि वाक्यात उपयोग करा.
- तोंड – तोंडभर
वाक्य – बाबांनी आज जेवणाचे तोंडभार कौतुक केले .
- पिशवी – पिशवीवर
वाक्य – आईने पिशवीभर भाजी आणली .
- हात -हातभर
वाक्य- सुनंदा चे केस हातभर लांब झाले आहेत .
- घर – घरभर
वाक्य – छोट्या मिनूची खेळणी घरभर पसरली होती .
प्रश्न ५ तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती पाच वाक्यात लिहा.
उत्तर : उत्तरासाठी निबंधलेखन मध्ये जा .