प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
- नवीन पाऊस सुरु होण्याचा मातीवर काय परिणाम होतो?
उत्तर : नवीनच पाऊस सुरू होतो तेव्हा मातीचा एक रंग सुंदर वास सुटतो.
- श्यामने कोणता निश्चय केला होता?
उत्तर : आपल्या धाकट्या भावाला गणेश चतुर्थीला नवीन कोट व सदरा शिवून न्यायचा असा निश्चय श्यामने केला होता.
- लहान भावाला आईने कसे समजावले?
उत्तर : लहान भावाला आईने सांगितले की, तुझे अण्णा, दादा जेव्हा मोठे होतील, पैसे कमवतील, तेव्हा त्यानंतर सहा महिन्यांनी तुला नवीन सदरा शिवतील . आता हट्ट करू नकोस.
- श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात?
उत्तर : श्यामचे वडील कोर्ट-कचेरीच्या कामासाठी वरचेवर दापोलीला जात.
- श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते?
उत्तर : आपल्या लहान भावासाठी शिवलेला नवीन कोट कधी एकदा भावाला देतो, असे श्यामला झाले होते. सुखस्वप्नात तो दंग झाला होता. त्यामुळे त्याला चालण्याचे श्रम वाटत नव्हते.
प्र. २. खालील आकृत्या पूर्ण करा.
- श्यामला थंडीच्या दिवसांत ना मिळणाऱ्या गोष्टी
उत्तर : मफलर, जाकीट, गरम कोट.
- श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आईवडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न
उत्तर :
नवीन कोट कोणाला आणला ?
कोट साठी पैस पैसे कुठून आणले ?
कोणाकडून उधार पैसे घेतले ?
फीचे पैसे खर्च केले ?
उधारीवर शिवून आणला का ?
प्र. ३. का ते लिहा.
- श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते.
उत्तर : श्यामने बाबांनी दिलेले खाऊचे पैसे साठवून आपल्या लहान भावासाठी कोट शिवून घेतला होता. तो कोट तयार झाला तेव्हा तो पाहून श्यामचे डोळे अधूंनी न्हाले होते.
- श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला ‘जाऊ नको’ असे म्हटले.
उत्तर : खूप पाऊस झाला होता. नदीनाल्यांना पूर आले होते. पिसईचा पऱ्ह्या (ओढा) , सोंडेघरचा पऱ्ह्या (ओढा) यांना उतार नव्हते, यामुळे श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला ‘जाऊ नको’ असे म्हटले.
- पिसईचा पऱ्ह्या दुथडी भरून वाहत होता.
उत्तर : खूप जोरात पाऊस येत होता त्यामुळे पाण्याला पण खूप जोर होता. म्हणून पिसईचा पऱ्ह्या दुथडी भरून वाहत होता.
- श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला.
उत्तर : श्यामची आई त्यांच्या लहान भावाला म्हणत असे, “तुझे अण्णा, दादा मोठे होतील मग तुला नवीन कोट शिवतील”. त्याप्रमाणे श्यामने स्वत:च्या खाऊचे पैसे साठवून आपल्या लहान भावासाठी नवीन कोट शिवून आणला होता म्हणून श्यामने
- खेळूया शब्दांशी
खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा.
थंड X गरम
सापडणे X हरवणे
सुगंध X दुर्गंध
थोरला X धाकटा
जुना X नवीन
लक्ष X दुर्लक्ष
स्मृती X विस्मृती
(आ) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
(१) समीरा, विनीता, त्यांनी, निखिल.
उत्तर : त्यांनी
(२) मी, सातपुते, त्याने, तिला.
उत्तर : सातपुते
(३) हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य.
उत्तर : हिमालय
(४) लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे.
उत्तर : आम्ही