प्रश्न १. कोण ते लिहा .
अ ) बागेत स्वछंदपणे फिरणारे .
उत्तर : फुलपाखरू
आ ) कामात मग्न असणारी .
उत्तर : मधमाशी
इ ) थुईथुई नाचणारे
उत्तर : कारंजे
प्रश्न २. जोड्या जुळवा
‘अ गट ‘ ‘ब गट ‘
सुंदर मध
औषधी सुवास
मंद सकाळ
दरवळणारा वारा
उत्तर :
‘अ गट’ ‘ब गट ‘
सुंदर सकाळ
औषधी मध
मंद वारा
दरवळणारा सुवास
प्रश्न ३. तुम्हाला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो ?
उत्तर : बागेत सुंदर, रंगबिरंगी, उमललेली वेगवेगळी फुले पाहून खूप आनंद होतो .
प्रश्न ४ . एक , मध यासारखे पाठात आलेले शब्द लिहा . (बाराखडीतील एकही चिन्ह नसलेले शब्द)
उत्तर : बघ, पण सवड तर धन
प्रश्न ५. खालील शब्दांना ‘दार’ शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा .
उदाहरण : ऐट -ऐटदार
चमक ,दुकान , माल ,चोप ,भाल , खास , आम , गमती ,रुबाब , वजन
उत्तर :
- चमकदार
- दुकानदार
- मालदार
- चोपदार
- भालदार
- खासदार
- आमदार
- गमतीदार
- रुबाबदार
- वजनदार
प्रश्न ६. खालील शब्दांना पणा शब्द जोडून नवीन शब्द बनले आहेत . वाचा . शब्द वापरून वाक्य लिहा .
चांगुलपणा ,मोठेपणा ,लहानपणा , वेगळेपणा , मोकळेपणा , सोपेपणा ,कठीणपणा
उत्तर :
- माणसाने नेहमी दुसर्यांचा चांगुलपणा घ्यावा .
- मोठेपणा हा तो गुण आहे जो पदाने नाही तर संस्काराने प्राप्त होतो .
- लहानपणा पासून आम्ही दिवाळी मध्ये गावी जातो .
- अमर गर्दीत आपल्या वेगळेपणाची छाप पाडत होता .
- स्वाती आमच्याशी मोकळेपणाने बोलत होती .
- शिक्षकांनी आम्हाला भाषेतला सोपेपणा समजवला .
- दुसर्यांशी इंग्रजी बोलताना कठीणपणा वाटून घेऊ नये .