प्र. १. ‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे,’ हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.

उत्तर: प्रसिद्ध लेखक व साहित्यिक ‘वसंत शिरवाडकर’ लिखित ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठात लेखकाने वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या कॅक्टस या वनस्पतीची वैशिष्ट्ये, तिचे उपयोग, कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता याचे सूक्ष्म वर्णन केले आहे. कोणतीही वनस्पती पाण्याशिवाय जगू शकत नाही. वाळवंटात तर वर्षातून एखादाच पाऊस पडतो. कधी-कधी तर दोन- तीन वर्षे पाऊस पडत नाही. परंतु ; निसर्ग थोड्या पाण्यातही वाळवंटात वनस्पती फुलवतो. कठीण काळानंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा एखादी जादू व्हावी त्याप्रमाणे जमिनीत असलेल्या बियांना अंकुर फुटतात व त्यांची रोपे बनतात. म्हणून निसर्ग एखाद्या जादूगरसारखा काम करतो.

प्र. २. ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस !’ या विधानाची यथार्थता लिहा.

उत्तर: प्रसिद्ध लेखक व साहित्यिक ‘वसंत शिरवाडकर’ लिखित ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठात लेखकाने वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या कॅक्टस या वनस्पतीची वैशिष्ट्ये, तिचे उपयोग, कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता याचे सूक्ष्म वर्णन केले आहे. कॅक्टस ही काटेरी आणि कमी पाण्यात जगणारी वनस्पती त्या प्रदेशातील इतर वनस्पतींचे प्रतिनिधित्व करणारी प्रमुख वासपटी आहे. वाळवंटात तर वर्षातून एखादाच पाऊस पडतो. कधी-कधी तर दोन- तीन वर्षे पाऊस पडत नाही. पाऊस पडतो तेव्हा जे काय पाणी मिळवता येईल तेवढे पाणी ह्या वनस्पती स्वत: मध्ये साठवून ठेवतात आणि कोरड्या हंगामात मंद गतीने वाढतात.

प्र. ३. टिपा लिहा.

  • सग्वारो कॅक्टस

उत्तर: सग्वारो कॅक्टस हा कॅक्टसचा राजा आहे. आकाराने सर्वात मोठी व दीर्घकाळ जगणारी ही कॅक्टसची एक जात आहे.

  • सग्वारो कॅक्टसचे दिसणे – हा कॅक्टस ५० फूट उंचीपर्यंत वाढतो. त्याची वाढ इतकी मंद असते की ५० वर्षात तो फक्त ३ फूट वाढतो आणि २०० वर्षे जगतो. सग्वारो कॅक्टसला शेंड्यावर येणारी फुले पुष्कळशी फुलासारखी गेंदेदार असतात. ही फुले फुलली की थोड्या काळासाठी ओसाड वाळवंटाला सौंदर्याचा स्पर्श होतो. सग्वारो कॅक्टसला फळे येतात व त्यातला गर कलिंगडाच्या गरासारखा असतो.
  • सग्वारो कॅक्टसचे उपयोग – अमेरिकेतील रेड इंडियन लोक पूर्वीच्या काळी सग्वारो कॅक्टसचा अनेक प्रकारे उपयोग करुन घेत असे. अवर्षणाच्या काळात सग्वारो कॅक्टसला चेचून ते त्याचे पाणी काढत व आपली तहान भागवत असे. सग्वारो कॅक्टसच्या फळातील गर रेड इंडियन लोक चविणे खात असे. त्या फळाच्या गरत साखर घालून तो मोरावळ्यासारखा टिकवता येतो. हेही एक खाद्य म्हणून रेड इंडियन लोक खात असे.

प्र. ४. वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा.

उत्तर: वाळवंटातील कोरड्या प्रदेशात उष्ण हवामान असते, तिथे पाण्याचीही कमतरता असते. अशा परिस्थितही वनस्पती आपले अस्तित्व टिकून ठेवतात. कॅक्टसच्या झाडामध्ये रसदार गर असतो. ह्यासाठी प्राणी कॅक्टसच्या झाडावर हल्ला करू शकतात. ओल्या प्रदेशात पाण्याची टंचाई नसल्याने झाडे जनावरांनी ओरबाडून खाऊन टाकली तरी पुन्हा उगवू शकतात. वाळवंटी प्रदेशात हे शक्य नाही. पाण्याच्या टंचाईमुळे झाड एकदा गेले तर ते पुन्हा उगवणार नाही , म्हणून वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असतात. 

प्र. ५. ‘पाणी हेच जीवन !’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.

उत्तर: पाणी म्हणजे सजीवांचे ‘जीवन’. पाणी नसेल तर सजीव जगूच शकत नाही. एकवेळ अन्नाशिवाय सजीव काही काळ जगू शकतो परंतु ; पाण्याशिवाय नाही. माणसाला तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कामात पाण्याची आवश्यकता असते. पाणी नसेल तर पशू-पक्षी, झाडे काहीच टिकणार नाही. सर्व सृष्टी उजाड होईल. सर्वत्र वाळवंट, ओसाड राने तयार होतील. जीवसृष्टी नष्ट होईल. म्हणूनच ‘पाणी हेच जीवन !’