प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

  1. लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते?

उत्तर : लेक घरात नसताना कवयित्रीला लेकीची ओढ लागलेली असते, वेळ जागीच थांबल्यासारखी तिला वाटते आणि कवयित्रीचे मन उदास होते. 

  1. कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे?

उत्तर : घरामध्ये लेक चिमणीप्रमाणे सतत बोलत असते, हसत असते म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे.  

  1. कवितेतील लेक केव्हा रुसून बसते?

उत्तर : लेकीला जर ओरडले तेर ती रुसून बसते. 

प्र. २. खालील आकृत्या पूर्ण करा.

C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-28 at 14.10.08.png
  1. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे 

उत्तर :

  • तांबडं कुंदन 
  • हिरव गोंदण 
  • झाडाची पालवी 
  • हाडांच चंदन 
  • बोलकी चिमणी 
  • पाकळी 
  1. लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे

उत्तर : 

  • मनाची काळजी मिटते. 
  • घरात रोज समई पेटते 
  • घर प्रसन्न व बोलके राहते.

प्र. ३. तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हाला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.

उत्तर : माझी ताई घरात नसली तर माला खूप एकटेपणा वाटतो. ताई आणि मी एकत्र असलो की खूप मज्जा करतो. ताई माझा अभ्यासपण घेते आणि माझ्याबरोबर खेळतेपण.  ती घरी नसली की माला अजिबात करमत नाही. माझा वेळ जात नाही. काहीही केले तरी मला कंटाळवाणे वाटते. सारखी ताईची आठवण येऊन मन उदास होते.  

प्र. ४. पाठ क्रमांक २ ते पाठ क्रमांक ११ यामध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.

उत्तर : सर्व पाठातील शब्दार्थ मध्ये दिलेले शब्द विदर्थ्यांनी लिहावे.  

  • खेळूया शब्दांशी

अ) कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.

उदा., कुंदन – गोंदण, चंदन 

उत्तर : मनाची – घराची , 

हसते- मिटते, पेटते

 उरास -उदास

 भाषा – आशा

खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-28 at 14.10.50.png

उत्तर : आहा ! किती चपळ आहे हा ससा. 

C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-28 at 14.10.50 (1).png

उत्तर : सायली तुझा झगा किती छान आहे !

C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-28 at 14.10.50 (2).png

उत्तर : आई ग ! ठेच लागली. रक्त येतय.