प्र. १. नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समीरा, मानसी, माधवी हे शब्द ‘अकारविल्हे’ प्रमाणे लावा.

उत्तर : अंबर, आलोक, नम्रता, माधवी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर, समिरा, समीर.

प्र. २. तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? सोदाहरण सांगा.

उत्तर : पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे मी शब्दकोशाचा वापर करेल.  शब्दकोशात एखादा शब्द शोधताना ‘अकारविल्हे’ म्हणजे ‘अ’ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो. शब्दकोशामध्ये शब्दांना लागलेले प्रत्येय वगळून सामान्य रूप वगळून मूळचा  शब्दच शोधायचा असतो. उदाहरणार्थ-‘प्रकट’ हा शब्द शोधायचा झाल्यास सर्वप्रथम पहिले अक्षर म्हणजेच वर्णमालेत कोणत्या स्थानी येते याचा शोध घ्यावा लागेल. यामध्ये ‘प्र’ हे जोडाक्षर आहे. म्हणजेच ‘प+र=प्र’ शोधायचा व त्यानंतर येणारे  व्यंजन शोधायचे म्हणजेच ‘क’ आणि ‘ट’. 

प्र. ३. शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर : शब्दकोशाचा उपयोग केल्यामुळे प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळते. शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागते. एकाच शब्दाचे विविध अर्थ सांगता येतात. संदर्भानुसार कोणता अर्थ घेणे बरोबर आहे, हे आपल्याला कळते. म्हणजेच बोलताना, लिहिताना किंवा वाचताना नेमका कुठला अर्थ घ्यायचा आहे, हे आपल्याला कळते. शब्दांचे अर्थ व मोल कळते. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द वापर तसेच समर्पक शब्द मांडण्याच्या प्रवासात शब्दकोश अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. 

प्र. ४. शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा.

  • शब्दकोशाचा उपयोग 
  • शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे

उत्तर : शब्दकोशाचा उपयोग- एखाद्या भाषेच्या बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला ‘शब्दकोश’ म्हणतात.  शब्दकोशामध्ये प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ दिलेला असतो, ते आपण पाहू शकतो. एकाच शब्दाला विविध अर्थ असतात. संदर्भानुसार कोणता अर्थ योग्य आहे हे आपल्याला शब्दकोशामुळे कळते. काही शब्दांचे अर्थ लिहून कळत नाहीत, अशा शब्दांचे चित्रीकरणही शब्दकोशात केलेले असते, त्यामुळे तो शब्द समजण्यास मदत होते. 

शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे- भाषा समृद्ध करण्यासाठी प्रत्येक शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेणे गरजेचे असते, यासाठी शब्दकोशाची गरज असते. कारण शब्दकोशामध्ये बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीने केलेला असतो. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो, हे कळते. शब्दाचा योग्य अर्थ माहिती करून घेण्याची सवय लागते. एकाच शब्दाचे विविध अर्थ असतात ते समजून घेऊ शकतो.  शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात घेणे हे शब्दकोशाचे उद्दिष्ट आहे.