प्र. १. अ आकृतिबंध पूर्ण करा.

  1. सर हंफ्रे डेव्ही यांनी तयार केलेल्या दिव्याच्या मर्यादा

उत्तर : 

  • दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे खर्चिक होते. 
  • त्यातून निर्माण होणारा विषारी वायू धोकादायक होता. 
  • प्रकाश जास्त वेळ टिकणारा नव्हता. 
  • त्यातून निघणारा प्रकाश फार प्रखर होता. 
  1. बांबूच्या निरनिराळ्या जाती गोळा करण्यात एडिसनच्या सहकाऱ्यांना आलेल्या अडचणी

उत्तर : 

  • आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास करावा लागला. 
  • आफ्रिका खंडातील हिंस्र पशुशी सामना करावा लागला. 
  • मलेरिया या आजाराशी सतत सामना करावा लागला. 
  • असंख्य बांबूपैकी उपयुक्त बांबू शोधण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होत होता.

आ रिकाम्या जागा भरा.

  1.  २१ ऑक्टोबर १८९७  या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
  1.  वर्तमानपत्रातून माध्यमातून दिव्याच्या शोधाची बातमी सर्वत्र पसरली.

प्र. २. अ योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

  1.  प्लेटीनमचा प्रयोग ……………. होता.

(स्वस्त, फायदेशीर, महागडा, व्यवहार्य)

उत्तर : प्लेटीनमचा प्रयोग महागडा होता.

  1. फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ……………… वाचतात.

(पैसे, श्रम, कागद, प्रयत्न)

उत्तर : उत्तर : फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे श्रम वाचतात.

आ) आकृती पूर्ण करा.

एडिसनच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेषण

उत्तर : 

  • बुद्धिमत्ता
  • संकटांना तोंड देण्याची वृत्ती 
  • मनातील कल्पनांचा सतत पाठपुरवठा करणे
  • अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी 

.

प्र. ३. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

१ घराभोवती दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले.

उत्तर : घराभोवती दिव्याचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले.

२ कार्बनचा तुकडा जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चिक होते.

उत्तर : कार्बनचा तुकडे जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चिक होते.

३ अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.

उत्तर : अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटही प्रसिद्ध केली.

४ फसलेल्या प्रयोगांची पद्धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.

उत्तर : फसलेल्या प्रयोगांची पद्धतशीर नोंद एडिसनने वह्यांमध्ये ठेवली.

प्र. ४. स्वमत.

१ संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.

उत्तर : प्रसिद्ध लेखक ‘डॉक्टर अनिल गोडबोले’ लिखित ‘दिव्याच्या शोधा मागचे दिव्य’ या पाठामध्ये ‘थॉमस अल्वा एडिसन’ यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधा मागची कथा तसेच एडिसन यांची प्रयोगशीलता याचे मार्मिक वर्णन लेखकांनी केले आहे.

 एडिसन हे सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणारे एक संशोधक होते. त्यामुळे त्यांनी दिव्याचा शोध लावल्यानंतर त्यांच्या टीकाकारांना आश्चर्य वाटले. पण एडिसन यांनी मार्मिकपणे सांगितले की बुद्धिमत्ता पेक्षा माझ्याकडे संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची, व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच जोमाने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी होती. त्यामुळे माझ्या यशामध्ये एक हिस्सा भाग बुद्धिमत्तेचा तर 99 हिस्से भाग हा चिकाटीचा आहे.

 म्हणजेच विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही, तर त्यासाठी संकटांना तोंड देण्याची मानसिकता असलीच पाहिजे. एखाद्या प्रयोगात एकदा अपयश आले तर ते पुन्हा पुन्हा करून पहाणे तितकेच गरजेचे आहे. शिवाय छोट्या छोट्या गोष्टींचे बारीक निरीक्षण करणे त्यांचे अनुमान काढणे हेही तितकेच गरजेचे आहे. यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे, जिज्ञासू वृत्ती ठेवणे, वैज्ञानिक दृष्टिकोन असणे, तसेच अपयश पचवण्याची ताकद असणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

२ विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहेत का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.

उत्तर : कुठल्याही गोष्टीचा संशोधन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते ती म्हणजे चिकाटी. मी संशोधक करण्यासाठी सगळ्यात आधी चिकाटी वृत्ती अंगी बाळगेल. संशोधन करताना मला एकच प्रयोग कदाचित हजार वेळा करावा लागेल. त्यासाठी मला धीर असणे, सहनशक्ती असणे हे सगळ्यात जास्त गरजेचे वाटते. म्हणून मी माझी सहनशक्ती वाढवेल. मोठमोठ्या शास्त्रज्ञांची चरित्रे वाचून, त्याची माहिती घेऊन मी माझी वैज्ञानिक दृष्टी सुधारेल. प्रत्येक छोट्या गोष्टीचे बारीक निरीक्षण करून त्यांची नोंद ठेवण्याची सवय लावून घेईल. मी अपयशांना तर खचून जाणार नाहीच, पण लोकांनी कितीही चिडवले किंवा हिणवले तरीही मी आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाही.

३ तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?

उत्तर : माझ्या मनात आलेला विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मी सगळ्यात आधी माझ्या विचारांचा लोकांना कसा फायदा होईल किंवा त्यामुळे कुठलाही तोटा होणार नाही किंवा संकट येणार नाही याचा विचार करेल. जर कोणी माझी थट्टा मस्करी केली तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष करेल. मनातले विचार प्रत्यक्ष आणण्यासाठी माझ्यासमोर कुठले संकट येईल किंवा अडचणी येतील याचा मी सारासार विचार करेल. त्या संबंधित येणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही विचारांना मी दडपून टाकणार नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. मी सर्वात आधी त्या विषयाबद्दल माहिती गोळा करेल, त्याचा अभ्यास करेल आणि सतत वाचन करून त्या गोष्टींची नोंद ठेवेल. गोष्टी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज भासणार आहे याची पूर्ण यादी करून मगच मी ती गोष्ट अस्तित्वात आणेल. 

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

प्र. १. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

उत्तर : विद्यार्थ्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी

  1. चांगले साहित्य वाचणे. 
  2. योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणे.
  3. योग्य ठिकाणी खर्च करणे. 
  4. आवश्यक तेवढेच बोलणे. 
  5. इतरांच्या मदतीसाठी तयार असणे. 

प्र. २. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.

उत्तर : मी लहानपणापासून माझ्या वडिलांना बघत आलो आहे. त्यांच्या चांगल्या सवयी त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच रुबाबदार करते. पहाटे लवकर उठण्याची व रोजच्या रोज व्यायाम करण्याची त्यांची सवय असल्यामुळे ते आजही निरोगी आहेत. माझे आजोबा भारतीय सैन्य दलामध्ये आहेत. त्यामुळे ते शिस्तप्रिय तर आहेतच परंतु ; ते वेळेचे बंधन पाळणारेही आहेत. वेळच्यावेळी जेवणे, वेळच्या वेळी व्यायाम करणे, चालायला जाणे, अगदी जेवणापासून- झोपण्यापर्यंत सर्व गोष्टी ते वेळच्या वेळीच करतात. या सगळ्या चांगल्या सवयी त्यांच्या अंगी असल्यामुळे ते देशाच्या सैन्य दलातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणून नेमले गेले आहेत. त्यांनी त्यांच्या कारकर्दीमध्ये स्वतः प्रयत्न करून हे यश गाठलेले आहे. लहानपणापासून त्यांना सैन्यदलाचे आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी स्वतः कष्ट करून, वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन, ते सैन्य दलात भरती झाले. आमच्या घरात सर्वजण ते प्रयत्नशील असण्याचा व चिकाटी या गुणांवर भरभरून बोलतात. आम्हाला सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटतो. समाजात त्यांना खूप मोलाचे व आदराचे स्थान आहे. त्यांनी स्वतः निवडलेल्या क्षेत्रामध्ये  स्वतः प्रयत्न खूप यश मिळवले आहे. त्यामुळे आज, ते जे काही आहेत ते त्यांच्या स्वप्नांच्या बळावर व चांगल्या सवयी असल्यामुळे. 

भाषाभ्यास

खालील शब्दसमूहांपासून सामासिक शब्द बनवा.

  1. विधीप्रमाणे

उत्तर : विधिवत

  1. प्रत्येक गल्लीत 

उत्तर : गल्लोगल्ली

  1. चुकीची शिस्त 

उत्तर : बेशिस्त

  1. धोक्याशिवाय 

उत्तर : विनाधोका / बिनधोक

  1. प्रत्येक दारी 

उत्तर : दारोदारी