प्रश्न १. थोडक्यात उत्तरे लिहा
अ ) आईला पाहताच मुलगा धावत का गेला ?
उत्तर : आईच्या हातात दोन मोठ्या पिशव्या होत्या त्या खूप जवळ असावेत आणि त्या पिशव्या उचलून आपण आईला मदत करावी असे मला वाटले म्हणून आईला पाहताच मुलगा धावत गेला .
आ ) आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते ?
उत्तर : किराणामालाच्या पिशव्यांच्या ओझ्याने आईचे हात लालेलाल झाले होते.
इ ) आईला बरे का वाटले ?
उत्तर : मुलाने आईच्या हातातील एक पिशवी घेतल्याने आईचे ओझे कमी झाले म्हणून आईला बरे वाटले.
ई ) मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले ?
उत्तर : मुलाने किराणा सामान सुट्टीच्या दिवशी आणायचे ठरवले.
प्रश्न २. खालील शब्दात शरीराचे भाग असणारे शब्द शोधा लिहा
उदा. सामान -मान , पोपट -पोट
पाठवणी – पाठ
यजमान – मान
आगबोट – बोट
तोंडपाठ – तोंड व पाठ
पोटपूजा – पोट
पायपुसणी – पाय
गालबोट – गाल व बोट
नाकतोडा – नाक
प्रश्न ३. खालील शब्द वाचा व तसेच लिहा
सुट्टी , हुश्श , चक्कर , लख्ख , बग्गी , गच्च , सज्जन , लठ्ठ , उड्डाण , अण्णा , पत्ता , कथ्थक , जिद्द , घट्ट , अन्न , गप्पा , झिम्मा , अय्या , गल्ली , सव्वा.
प्रश्न ४. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा
अ ) मोठे X लहान
आ ) हसणे X रडणे
इ ) जड X हलके
ई ) खाली X वर
उ )जाणे X येणे
ऊ )सांडणे X गोळा करणे
प्रश्न ५. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा
अ ) सामानाला = सामान
आ ) बाजारात = बाजार
इ ) चाललीस = चालणे
ई ) मनापासून = मन
प्रश्न ६. तुम्ही आईला कोणत्या कामात मदत करता ?आणखीन कोणत्या कामात मदत करू शकाल? ती कशी? वर्गात चर्चा करा.
उत्तर : विद्यार्थ्यानी हे कार्य स्वत: करावे .
प्रश्न ७ . तुमच्या घराजवळील किराणा मालाच्या दुकानात जाते तेथील वस्तूंची यादी करा .
उत्तर : विद्यार्थ्यानी हे कार्य स्वत: करावे .
प्रश्न ८. खालील शब्द वाचा. रंगछटा समजून घ्या .
लालेलाल , काळेकुट्ट , पांढरेशुभ्र , पिवळेधमक , जांभळट , निळसर , हिरवेगार .
प्रश्न ९. कंसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा.
( असतो , हळूहळू , शाळा , लवकर , पडली )
अ ) संजू लवकर उठतो.
आ ) गोगलगाय हळूहळू चालते.
इ ) हा बंगला नेहमी बंद असतो.
ई ) शाळा वेळेवर भरते. उ ) यावर्षी खूप थंडी पडली